shreewardhan cyclone affected homes

श्रीवर्धन: जून महिन्यात आलेल्या भयंकर निसर्ग चक्रीवादळात(nisarg cyclone effect on homes) अनेक आदिवासी वाड्या प्रभावित झाल्या. अनेक घरांवरचे पत्रे उडाले. घरे पडली. भिंती पडल्या. ५ जूनला वनवासी कल्याण आश्रमाने टीम तयार करून वनवासी भागात पाहणी केली. किती गावात पत्रे , ताडपत्री यांची गरज आहे आणि किती गावे पूर्णपणे प्रभावित झाली आहेत, याची पाहणी झाली. त्यानुसार योजना करून वेगवेगळी मदत देण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर घरे पुन्हा तयार झाली.

एकूण १२ गावांमध्ये पत्रे व ताडपत्री वाटप करण्यात आले आणि श्रीवर्धन(shreewardhan) तालुक्यातील ‘भोस्ते आदिवासी वाडी’ ही ११६ घरांची वाडी पूर्णपणे प्रभावित झाली होती. या वाडीचे पुनर्वसन करण्याचे निश्चित करण्यात आले. हे कार्य करण्यासाठी मुंबई अंधेरी येथील प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्ट च्या सहकार्याने या वाडीचे पुर्नवसन करण्यात आले. या वाडीतील आदिवासी परिवारांचा गृहप्रवेश १ नोव्हेंबरला होत आहे . सर्व समाज सोबत असल्यावर संकटे कितीही आली तरी त्यावर मार्ग हा निघतोच. नवीन घरे बांधुन मिळाल्यामुळे आदिवासी बांधव आनंदित असल्याचे पहायला मिळत आहे.