निसर्ग चक्रीवादळामुळे पनवेलमधील जनजीवन विस्कळीत

पनवेल : निसर्ग चक्रीवादळाने पनवेल तालुक्यात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.रस्त्यावर झाडे पडल्याने रस्ते बंद झाले. कोणाच्या घरांवरील छप्परे उडून गेली आहेत. विजेच्या तारा तुटल्याने अनेक भागात

पनवेल : निसर्ग चक्रीवादळाने पनवेल तालुक्यात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.रस्त्यावर झाडे पडल्याने रस्ते बंद झाले.  कोणाच्या घरांवरील छप्परे उडून गेली आहेत. विजेच्या तारा तुटल्याने अनेक भागात लाईट नव्हते. त्यामुळे पनवेलमध्ये आज पाणी पुरवठा होऊ शकला नाही. उद्य ही पाणी पुरवठा होण्याची शक्यता कमी आहे.त्यामळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे  

निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी पनवेल तालुक्याला मोठा फटका बसला आहे. या वादळाने अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः आदिवासी, डोंगर भागामध्ये या चक्रीवादळामुळे आणि पावसामुळे घरांचे नुकसान झाले आहे.  ताडपट्टी (मालडूंगे) येथील आदिवासी सामाजिक कार्यकर्ते गणपत जानू वारगडा यांच्या नवीन घराचे छप्पर वादळाने उडाले . त्यामुळे  ४० पत्रे  आणि १० पाईप त्याबरोबर भिंतीचा वरचा भाग या चक्रीय वादळ आणि पावसामुळे उडवल्याने त्यांचे  मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. गणपत वारडा यांनी सांगितले की , नशीब असे की, आमच्या कुटुंबाचा घरगुती कार्यक्रम होता म्हणून आम्ही घरातील सर्व जण माझ्या मोठ्या बंधूंच्या घरी होतो. त्यामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

निसर्ग चक्री वादळ आणि कोरोनाविरुद्ध लढणार्‍या कळंबोली पोलीस ठाण्यावर झाड पडल्याने त्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. याशिवाय जुन्या पुणे हायवेवर
४५ झाडे पडली होती. पनवेल तालुका पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने ती बाजूला करून रस्ता सुरळीत केला. नवीन पनवेलमध्येही मोठ्या प्रमाणात झाडे पडून नुकसान झाले आहे. यामध्ये अनेकांच्या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत.विजेचे पोल पडल्याने अनेक भागात रात्री लाईट नव्हते. विजेचे पोल पडल्याने वीज पुरवठा बंद राहणार असल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी दोन दिवस पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याचे महावितरणने कळवले आहे