traffic police panvel

पनवेल : नवीन पनवेल उड्‌डाणपुलावरुन पनवेलला येताना पडलेल्या खड्ड्यांमुळे(potholes) वाहनचालकांना वाहने चालविताना अडचण निर्माण होत होती. त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी निर्माण होवून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याची बाब लक्षात घेऊन पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी(panvel city traffic police) खड्‌डे भरुन वाहतूक सुरळीत केल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

पनवेलमधून नवीन पनवेलमध्ये किवा माथेरान रस्त्याकडे येण्यासाठी असलेल्या पुयलच्या दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडल्याने दोन्ही सिग्नलजवळ वाहतूक कोंडी होत होती. मात्र महापालिकेचे खड्‌डे भरण्याचे काम असतानासुध्दा महापालिका आणी सिडको एकमेकांकडे बोट दाखवून नागरिकांच्या गैरसोयीकडे लक्ष देत नव्हते. अनेक दिवस हे खड्‌डे भरले जात नसल्याने वाहन चालक त्रस्त झाले होते. वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहन चालक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करीत होते.

पनवेल शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक वायंगणकर, हवालदार धनंजय घाडगे, महिला पोलीस शिपाई साधना पवार, ज्योती कहांडळ, पोलीस शिपाई निलेश भंगाळे आदी वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांनी खड्डे भरणे आपले काम नसताना वाहतूक सुरळीत करण्यासाठी जेसीबीव्दारे खड्‌डे भरुन घेतल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.