no parking board in city

महाड शहरातील अरुंद रस्ते जसे या वाहतूक कोंडीला(traffic jam) कारणीभूत आहेत तसेच बेशिस्त वाहन चालकदेखील कारणीभूत आहेत. त्यामुळे  वाहतूक शाखेने शहरात काही ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावून वाहतूक नियमन करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

महाड: महाड(mahad) शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत वाहतूक कोंडी हा कायमस्वरूपी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. आजवर अनेक उपाय योजना करूनही हा प्रश्न निकाली निघालेला नाही. शहरातील अरुंद रस्ते जसे या वाहतूक कोंडीला(traffic jam) कारणीभूत आहेत तसेच बेशिस्त वाहन चालकदेखील कारणीभूत आहेत. त्यामुळे  वाहतूक शाखेने शहरात काही ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावून वाहतूक नियमन करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

महाड बाजारपेठेत एक दिशा मार्ग आणि एके दिवशी दक्षिणेकडे तर दुसऱ्या दिवशी उत्तरेकडे अशा पद्धतीने पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र बाजारपेठेत येणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्याच इतकी प्रचंड असते की दररोज निम्मा रस्ता पार्क केलेल्या दुचाकींनी भरून जात असतो. चवदारतळे, शिवाजी चौक आणि शहरातील मुख्य रस्ते त्याच प्रमाणे दोन प्रमुख रस्त्यांना जोडणारे रस्ते देखील पार्क करण्यात आलेल्या दुचाकीनी भरून गेलेले असतात.

मात्र आता वाहतूक शाखेने वाहनांची गर्दी होण्याऱ्या शिवाजी चौक, चवदार तळे या परिसरात नगर पालिकेच्या सहकार्याने नो पार्किंगचे फलक लावून काही प्रमाणात का होईना वाहतूक नियमन करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. हे फलक असलेल्या भागात तरी दुचाकी आणि अन्य वाहने पार्क करण्याचे टाळले तरी वाहतूक कोंडीच्या बाबतीत काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.मात्र, या नंतरही जर नो पार्किंग परिसरात वाहने पार्क करण्याचे प्रकार घडले तर वाहने जप्त करण्याची मोहिम नगर पालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाने सुरु करावी,अशी मागणी पुढे होवू लागली आहे.