आंबेत परिसरातील तलावांची पाणी पातळी खालावली, मुक्या जनावरांची होतेय गैरसोय

म्हसळा : सध्या देशात कोरोनाचे विषाणू महामारीमुळे सर्वत्र हाहाकार जाणवत असून याचा जैविक घटकांवर चांगलाच परिणाम झालेला दिसून येत आहे. यामुळे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. मनुष्य बळावर आर्थिक संकट

 म्हसळा : सध्या देशात कोरोनाचे विषाणू महामारीमुळे सर्वत्र हाहाकार जाणवत असून याचा जैविक घटकांवर चांगलाच परिणाम झालेला दिसून येत आहे. यामुळे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. मनुष्य बळावर आर्थिक संकट ओढवलेले असताना अनेक भागात शेतकरी वर्गसुद्धा आपल्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने हताश झाला आहे. अशातच ज्याच्या जीवांवर तो शेती पिकवतो अशा गुरांना देखील चारा आणणे त्यास मुश्किल होऊन बसले आहे. यातच आंबेत परिसरातील शेतकरी वर्ग आपल्या गुरांच्या वैरण पाणी या प्रश्नांबाबत चिंतेच्या विळख्यात सापडला आहे. आंबेत परिसरात असलेले गुरांच्या पिण्याच्या पाण्याचे तलाव आटले आहेत. सर्वत्र तलावांतील पाण्याची पातळी खालावली असून मुक्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीमार्फत अशा तलावांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडून गुरांची होणारी भटकंती थांबवून गुरांच्या होणाऱ्या पाणी भटकंतीला मदत करून मुक्या जनावरांची तहान भागविणे गरजेचे आहे, अशी विनंती आंबेत परिसरातील शेकतरीवर्ग करीत आहेत. देशात मनुष्यबळावर होणाऱ्या उपासमारीला आणि मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या पाणी संकटाला कुठेतरी मदत करणे गरजेचे असून ग्रामपंचायतींनी अशा पाणीसाठा कमी झालेल्या तलावांची योग्य मर्यादा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीसुद्धा होत आहे.