rape in nagpur

पनवले : कळंबोलीतील सत्यम हॉस्पिटल मधील डॉक्टर रुग्णालयातील परिचारिकांवर अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालय प्रशासनाकेड अनेकदा तक्रार दाखल करुनही दखल न घेतल्याने एका परिचारिकेने पोलिस ठाणे गाठत या अत्याचाविरोधात तक्रार दाखल केली.

या परिचारिकेच्या तक्रारीनंतर सत्यम हॉस्पिटल मधील डॉक्टर अमरेंद्र यादव विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाच गुन्हा दाखल झाला आहे.

डॉक्टर अमरेंद्र यादव हा परिचारीकांसमोर अश्लील हावभाव करत त्यांच्यासह अश्लील संभाषणही करत होता. इतकचं नाही तर रात्री अपरात्री तो परिचारिकांच्या हॉस्टेल मध्ये जाऊन त्यांना त्रास देत होता. त्याच्या या कृत्याला विरोध करणाऱ्या परिचारिकांना तो कामावरुन काढून टाण्याची धमकी देत होता असे या पीडित परिचारीकेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

त्याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या परिचारिकांनी याची माहिती डॉक्टर हिमा बरनवाल आणि डॉ. बिंदू बरंनवाल यांना दिली. मात्र, त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून पोलिसात धाव घेतल्याचे तक्रारदार परिचारीकेने सांगीतले.

डॉक्टर अमरेंद्र यादवला पाठीशी घालणाऱ्या डॉक्टर हिमा बरनवाल आणि डॉ. बिंदू बरनवाल यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशषी मागणी या परिचारिकेने पोलिसांकडे केली आहे.