राखी पौर्णिमेनिमित्त विविध राख्या विक्रीस, बाजारपेठा राख्यांनी फुलल्या

  • रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर धाटाव ग्रामिण भागासह शहरातून राख्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २० टक्के भावात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचा सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर धाटावसह वरसे, रोहा शहरातील चौकाचौकात, भाजी मार्केट, मीना बाजारपेठ तसेच मुख्य बाजारपेठेमध्ये मोठ्या संख्येने राख्या विक्रीसाठी आलेल्या आहेत.

 सुतारवाडी – बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र कोरोना संसर्गजन्य महामारी आजाराने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून राखी खरेदीसाठी दुकानातून गर्दी दिसून येत आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर धाटाव ग्रामिण भागासह शहरातून राख्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २० टक्के भावात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचा सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर धाटावसह वरसे, रोहा शहरातील चौकाचौकात, भाजी मार्केट, मीना बाजारपेठ तसेच मुख्य बाजारपेठेमध्ये मोठ्या संख्येने राख्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. 

राख्यांची विक्रीस पाहिजे तसा उत्साह दिसत नसल्याची माहिती येथील विक्रेत्यांकडे चर्चा केल्यावर समजले आहे. हिंदू संस्कृतीत बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राखी पौर्णिमेला मोठे महत्त्व आहे. यंदा नारळी पौर्णिमा – रक्षाबंधन सोमवार दि. ३ ऑगस्ट रोजी असून त्यास आता केवळ एक दिवसाचा कालावधी शिल्लक आहे.  या पार्श्वभूमीवर ग्रामिण भागासह शहरातील गल्लीबोळात दुकाने थाटली आहेत. राख्या खरेदीसाठी महिलांची गर्दी गतवर्षीच्या मानाने कमी दिसून येत आहे. आता एक दिवस राख्या खरेदीसाठी गर्दीत खूपच वाढ होईल. अशी माहिती येथील विक्रेत्यांनी दिली. परंतु कोरोनामुळे सर्वच धंद्यात मंदीचे वातावरण दिसून येत आहे.     

रोहा शहरात, ग्रामीण भागात तसेच टप्प्या टप्प्यावर असणाऱ्या दुकानात, हातगाडीवर राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. रेशीम धाग्यालाही  महागाईची झळ पोहोचलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच बाजारपेठा विविध रंगांच्या, आकाराच्या राख्यांनी सजलेल्या पहातांना दिसत आहेत. मुलांमध्ये सध्या पब्जीचे वेड असल्यामुळे बहिणी देखील भावाला पब्जीच्या राख्या खरेदी करताना दिसत आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी महिलांची राख्या खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. तर काही बहीणींनी होम मेड राख्या बणविण्यावर भर दिला असून काहींनी प्रत्यक्ष तर काहींनी पोस्टाद्वारे राख्या पाठवून भावापर्यंत राखी पोहचवत आहेत. परंतु यावर्षी हा अनोख्या नात्याचा रेशीम धागा महागाईच्या तसेच कोरोना महामारी संसर्गजन्य आजाराच्या झळांनी २० टक्के महाग झाला आहे.   

रक्षा बंधनाचा दिवस हा आनंद देण्यासाठी- वेड्या बहिणीची वेडी ही माया म्हणा. की बहीण आणि भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक म्हणा. रक्षाबंधन म्हणजे सर्व भारतीय समाजाला जोडणारा स्नेहाचा रेशमी धागा होय. आपल्या भावाच्या हाताला शोभून दिसेल, त्याला रुचेल, आवडेल अशी राखी  शोधण्यासाठी बहीण अनेक दुकानांची पायपीट करून राखी पसंत करताना दिसत आहेत. त्यातच सध्या पब्जी हा प्रत्येकाचा आवडता खेळ झाला आहे. त्या खेळाच्या चित्राची सध्या सगळीकडे मागणी असल्यामुळे यावेळी राख्यांमध्ये देखील या खेळाचे चित्र असलेल्या राख्या ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे राखी विक्रेत्यांनी सांगितले आहे.

बहीण भावाचे अतूट नाते सांगणारा रक्षाबंधन हा सण तीन दिवसांवर आला आहे. यामुळे सध्या बहिणींची बाजारपेठांमध्ये गर्दी होताना दिसत आहे. वेगवेगळ्या रंगीत आकर्षण राख्या बाजारपेठांमध्ये आलेल्या आहेत. बच्चे कंपनींना आकर्षित करणार्या  वेगवेगळ्या राख्यांनी राख्या ही दिसून येत आहेत. १ रुपये ते २५० रुपयांपर्यंत राख्या बाजारात सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये काही चांदीच्या राख्या, साध्या गोंड्याच्या राख्या यांनाही चांगली मागणी आहे. बच्चे कंपनीसाठी छोटा भीम, मोटू, पतलू ,डोरेमॉन असे विविध कार्टूनच्या राख्या मोठ्या प्रमाणात आले आहेत. विविध प्रकारच्या देवदेवतांची चित्रे असलेल्या राख्या ही लक्ष वेधत आहेत.