सुधागड तालुक्यात कोरोनाचा शिरकाव, नागशेत येथे आढळला पहिला कोरोनाबाधित रुग्ण

पाली : कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून सुरक्षित असलेल्या सुधागडात आज एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे .मूळचा आपटवने गावचा रहिवासी असलेल्या नागशेत येथील ६२ वर्षीय वृद्धाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली

पाली : कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून सुरक्षित असलेल्या सुधागडात आज एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे .मूळचा आपटवने गावचा रहिवासी असलेल्या नागशेत येथील ६२ वर्षीय वृद्धाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती पाली सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर नागशेत परिसर कोरोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरन कक्षात ठेवण्यात आले आहे.

 आतापर्यंत कोरोनाच्या शिरकावापासून सुधागड तालुका बाचावलेला होता. मात्र तालुक्यात  नागशेत या ठिकाणी पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाल्याने  तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.हा व्यक्ती काही दिवसांपूर्वी गोरेगाव मुंबई या ठिकानाहून आपल्या गावी आला होता. या व्यक्तीला कोरोना आजाराची लक्षणे आढल्याने त्याला वावलोली येथील कोव्हिड-१९ विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.सदर व्यक्तीचे नमुने शुक्रवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवार(दि.२४मे)ला रात्री प्राप्त झाल्यानंतर सदर रुग्ण हा कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णास तात्काळ पनवेल या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  तालुका स्तरावर आम्ही आरोग्य विभाग,पोलीस प्रशासनाने सर्वोतोपरी दक्षता घेत प्रतिबंधात्मक खबरदारी व  उपाययोजना केल्या असल्याचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी सांगितले. मुंबई,ठाणे,पुणे शहरातून येणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाईन तसेच कोरोना विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुधागडात सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तर नागरिकांनी शासनाने आखून दिलेल्या नियमांचे व सूचनांचे करावे,कोरोना विषाणू संबंधित खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी केले आहे.