लॉकडाऊनमध्ये रोहा आगारातून परप्रांतीयांसाठी सोडण्यात आल्या १८० गाड्या

सुतारवाडी: कोरोना काळात अनेक परप्रांतीय रोहा शहरात अडकुन पडले होते. हाताला काम नाही की कुठेही बाहेर फिरता येत नाही. आपण आपल्या गावाकडे गेलेले बरे यासाठी त्यांनी रोहा तहसीलदारांकडे मागणी केली. रोहा

सुतारवाडी: कोरोना काळात अनेक परप्रांतीय रोहा शहरात अडकुन पडले होते. हाताला काम नाही की कुठेही बाहेर फिरता येत नाही. आपण आपल्या गावाकडे गेलेले बरे यासाठी त्यांनी रोहा तहसीलदारांकडे मागणी केली. रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी परप्रांतीयांची मागणी लक्षात घेऊन रोहा आगारप्रमुख सोनाली कांबळे यांच्या कानावर ही बाब लक्षात घालून परप्रांतीयांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी एसटीच्या गाड्या सोडण्याबाबत चर्चा केली. आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता परप्रांतीयांना आपल्या गावाकडे सोडण्यासाठी १८० गाड्यांची व्यवस्था केली. पर्यवेक्षक  खानापूरकर, तसेच शेलार, गडेकर, धोत्रे, बंडू येरूणकर आदींच्या सहकार्याने आगार प्रमुखांनी रोहा ते निपाणी( कर्नाटक हद्द ) ३६ गाड्या सोडल्या.  या गाड्यांना ७९२ प्रवासी होते. रोहा ते सोलापूरसाठी १२ गाड्या सोडण्यात आल्या. यामध्ये २६४ प्रवासी होते, रोहा ते जत २ गाड्या सोडण्यात आल्या. त्यात ४४ प्रवासी होते. रोहा ते अमरावती मार्गावर २ गाड्या सोडण्यात आल्या यात ४४ प्रवासी होते, रोहा ते सेंधवा (मध्य प्रदेश सीमा ) २२ गाड्या सोडण्यात आल्या. यामध्ये ४८४ प्रवासी होते. रोहा ते पनवेल रेल्वे स्टेशनसाठी ८१ गाड्या सोडण्यात आल्या. यामध्ये १७८५ प्रवासी होते.  रोहा ते नांदेडसाठी ५ गाड्या सोडण्यात आल्या. यामध्ये ११० प्रवासी होते. रोहा ते पालघरसाठी ३ गाड्या सोडण्यात आल्या. यात ६६ प्रवासी होते. रोहा ते उमरगासाठी १ गाडी सोडण्यात आली. यामध्ये २२ प्रवासी होते. रोहा ते मुंबई मार्गावर ५ गाड्या सोडण्यात आल्या. यामध्ये २९२ प्रवासी होते. रोहा ते कागल मार्गासाठी ११ गाड्या सोडण्यात आल्या. यामध्ये २४२ प्रवास होते. एकूण १८० एस.टी.च्या गाड्या विविध ठिकाणी सोडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये एकूण ४१४० प्रवाशांनी लाभ घेतला. सदरील विविध मार्गावर एसटीच्या गाड्या सोडण्यासाठी ६६ लाख रुपये खर्च आला. सध्या रोहा ते पनवेल,  रोहा ते विरझोली, रोहा ते तळा,  रोहा ते अलिबाग, रोहा ते नागोठणे या मार्गावर एसटीच्या गाड्या सोडण्यात आल्या असून कोरोनामुळे प्रवाशांचा प्रतिसाद खूपच कमी आहे.