दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीत मार्गदर्शन, साडेचार लाख विद्यार्थ्यांना पाठमालिकेचा लाभ, १४ तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या टीमचे परिश्रम

लाखो विदयार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत पाठमालिकेचा लाभ घेतला. यासह ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाठमालिकेत सहभाग घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी १४ तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या टीमने परिश्रम घेऊन पुस्तक तयार करण्यात आले आहे.

    नेरळ : मागील वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून शाळा देखील बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे विदयार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या पार्शवभूमीवर शासनाकडून शाळा बंद पण शिक्षण सुरु हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) पनवेल या संस्थेकडून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीत मार्गदर्शन करण्यात आले.

    लाखो विदयार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत पाठमालिकेचा लाभ घेतला. यासह ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाठमालिकेत सहभाग घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी १४ तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या टीमने परिश्रम घेऊन पुस्तक तयार करण्यात आले आहे. त्याचे प्रकाशनही नुकतेच करण्यात आले आहे.

    कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद पण शिक्षण सुरू या शासनाच्या उपक्रमच्या अनुषंगाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल या शासनाच्या संस्थेने रायगड जिल्ह्यातील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना झूम आणि युट्यूब च्या माध्यमातून मराठी विषयाचे मार्गदर्शन केले. या अंतर्गत आतापर्यंत जवळपास साडेचार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या पाठमालिकेचा लाभ घेतलेला आहे.

    दिनांक १ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ही पाठमालिका झाली. त्यासमयी ज्या विद्यार्थ्यांना नेटवर्क आणि मोबाइल समस्या आहेत अशा आणि इतरही अनेक विद्यार्थ्यांसाठी रायगड जिल्ह्यातील १४ शिक्षक तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या मदतीने ”यशमार्ग कृतीतून यशाकडे” या पुस्तकाचे प्रकाशन डायट-पनवेल संस्थेच्या प्राचार्या चंद्रकला ठोके यांच्या शुभहस्ते पनवेल येथे पार पडले. ही पाठमालिका आणि यशमार्ग पुस्तिका तयार करण्यात के. डी. पाटील, हेमकांत गोयजी, संघपाल वाठोरे आदी १४ तज्ज्ञ मार्गदर्शक आणि डायटच्या टीमने परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी अभ्यासात या पुस्तकाचा आधार नक्की घ्यावा असे आवाहन प्राचार्या चंद्रकला ठोके यांनी केले आहे.