ऑनलाईन संमेलन हे महिला साहित्यिकांसाठी व्यासपीठ – महापौर डॉ. कविता चौतमल

पनवेल: महिला साहित्यिकांसाठी ऑनलाईन कवी संमेलन हे व्यासपीठ असल्याचे मत पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमल यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या ऑनलाईन महिला विशेष कविसंमेलनाचे

 पनवेल:  महिला साहित्यिकांसाठी ऑनलाईन कवी संमेलन हे व्यासपीठ असल्याचे मत पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमल यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या ऑनलाईन महिला विशेष कविसंमेलनाचे उद्घाटन करताना व्यक्त केले.

 कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी  महापौर डॉ. कविता चौतमल यांनी कोरोना महामारीच्या संकटामुळे महिला कवी, साहित्यिक एकत्र भेटू शकत नाहीत पण तंत्रज्ञानाच्या  सहाय्याने महिला कवयित्रींना ऑनलाईन कवी संमेलन म्हणजे एक साहित्यिक पर्वणीच असल्याचे सांगितले. भागुबाई चांगु ठाकूर लॉ कॉलेजच्या प्राचार्या शितला गावंड यांनी तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रतिभावंत साहित्यिकांच्या कलागुणांना संधी  देण्यासाठी  कोमसाप नवीन पनवेल शाखेने या ऑनलाईन कवी संमेलनाद्वारे  एक व्यासपीठ निर्माण केळ्याचे सांगून महामारीच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कवी संमेलने सुरू आहेत, त्याला  मिळणारा उदंड प्रतिसाद  ही साहित्यिकांसाठी आनंदाची गोष्ट असल्याचे सांगून त्यांनी कवी संमेलनाला  शुभेच्छा दिल्या. 
या महिला कवी संमेलनामध्ये कवियत्री अनघा तांबोळी (नवी मुंबई ) यांनी पंगत ही कविता सादर केली तर प्रा. प्रज्ञा कल्याणकर (पुणे) यांनी लाजरा चंद्र ही कविता सादर केली. संध्या देवकर (रोहा) छाया गोवारी (पनवेल) यांनी गझल सादर केली तर योगिनी वैदू (पनवेल) यांनी आई ही कविता सादर केली.कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख प्रा.एल.बी.पाटील यांनी, कवींनी समाजभान भान ठेवून  सामाजिक विषय हाताळले पाहिजेत असे मत यावेळी व्यक्त केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात ज्योत्स्ना राजपूत यांनी,कोमसाप नवीन पनवेल शाखेच्या उपक्रमाविषयी माहिती विषद केली. आत्तापर्यंतच्या तीन कविसंमेलनाच्या पर्वामध्ये कवींचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिनी वैदू यांनी केले तर आभार मंदाकिनी हांडे यांनी मानले.