chavdar tale

चवदार तळे(chavdar tale) सत्याग्रहाचा १९ आणि २० मार्च रोजी वर्धापन दिन आहे. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन भीमसैनिक लाखोंच्या संख्येने महाडमध्ये(mahad) येत असतात.

  महाड:कोरोना(corona) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बाहेरून येणाऱ्या आंबेडकरी जनतेने, महाडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येऊ नये, असे आवाहन प्रशासन आणि महाडमधील(restrictions in mahad)mahad) विविध आंबेडकरी संघटनांनी केले आहे.

  चवदार तळे सत्याग्रहाचा १९ आणि २० मार्च रोजीवर्धापन दिन आहे. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन भीमसैनिक लाखोंच्या संख्येने येत असतात.

  गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे कुणालाच महाड शहरात प्रवेश देण्यात आला नव्हता. यावर्षी देखील तशीच परिस्थिती असल्याने, त्यावर विचार विनिमय करण्यासाठी आज महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस, तहसीलदार सुरेश काशीद यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली.

  या बैठकीला आरपीआयचे तालुका अध्यक्ष मोहन खांबे, दलित मित्र केशव हाटे, सखाराम सकपाळ यांच्यासह विविध आंबेडकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीला या संघटनांच्या प्रतिनिधींनीच, राज्यातील कुणीही आंबेडकरी जनतेने महाडमध्ये अभिवादन करण्यासाठी येवू नये असे आवाहन करणारा निर्णय जाहीर केला.

  महाडमध्ये १९,२० मार्च रोजी केवळ स्थानिक आंबेडकरी जनतेलाच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून चवदार तळ्याच्या जागी अभिवादन करण्यास परवानगी देण्यात येईल, असे त्यानंतर प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

  कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही.त्यामुळे आंबेडकरी जनतेने या निर्णयाचे पालन करून, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रतिमा पुदलवाड, निलेश तांबे यांच्यासह आंबेडकरी संघटनांच्या नेत्यांनी केले आहे.