पालीमध्ये ‘त्या’ गाई व बैलाचा संशयास्पद मृत्यू – नागरिकांनी केली शव विच्छेदनाची मागणी

पाली: पालीमधील श्री स्वामी समर्थ नगरात काल ३ गाई व आज १ बैल असे मिळून दोन दिवसांत ४ जनावरे संशयास्पदरीत्या मृत अवस्थेत आढळून आली. त्यामुळे या चारही जनावरांच्या शव विच्छेदानाची मागणी श्री स्वामी समर्थ

पाली: पालीमधील श्री स्वामी समर्थ नगरात काल ३ गाई व आज १ बैल असे मिळून दोन दिवसांत ४ जनावरे संशयास्पदरीत्या मृत अवस्थेत आढळून आली. त्यामुळे या चारही जनावरांच्या शव विच्छेदानाची मागणी श्री स्वामी समर्थ रहिवासी मंडळ यांनी पशुवैधकीय अधिकारी पाली यांच्याकडे केली आहे. त्यानुसार आज एका बैलाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. 
पाली येेेथील श्री स्वामी समर्थ नगरात गटारात व त्याबाजूच्या शेतात तीन गाई मृतावस्थेत नागरिकांना आढळून आल्या.त्यापैकी एक गाय दुपारी मेली असता तिला पाली ग्रामपंचायतीने उचलून नेले व त्यानंतर संध्याकाळच्या वेळी त्याठिकाणी दोन गाई मृतावस्थेत आढळून आल्या. तर आज पुन्हा एक बैल मृत आढळून  आल्याचे समजते. त्या गाईंच्या तोंडातून, डोळ्यांतून रक्त वाहत होते. अशा पद्धतीत दोन दिवसांमध्ये चार जनावरांचा मृत्यु तेही एकाच ठिकाणी होणे हे संशयास्पद आहे.
यापूर्वीही एक महिना अगोदर त्याचठिकानी एका गाईवर चाकूने वार केल्याचे आढळून आले होते. मात्र स्थानिक नागरिकांनी डॉक्टरांच्या सहाय्याने त्या गाईच्या जखमेच्या जागी टाके घालून तिला जीवदान  दिले होते. त्यामुळे वारंवार हा प्रकार का घडतो?  हा प्रकार कोण जाणीवपूर्वक करत तर नाहीत ना ? या गाईंची सुड बुद्धीने हत्या तर कोण करत नाही ना? असे प्रश्न स्थानिक नागरिकांना पडले आहेत.मुक्या जनावरांच्या अशा संशयास्पद मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने यावेळी मात्र श्री स्वामी समर्थ नगर रहिवासी येथील नागरिकांनी मृत पावलेल्या पशूंच्या शव विच्छेदनाची मागणी निवेदनाद्वारे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
 
उष्माघाताने कदाचित या गाईंचा मृत्यू झाला असावा. उष्माघाताने गुरे ताबडतोब मरतात. लोकांनी दुपारी १२ ते ४ या वेळात जनावरे बाहेर सोडू नयेत. गाईंच्या मृत्यू बाबत आम्ही आमच्या स्तरावर अहवाल देऊ.  – अजय कांबळे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, सुधागड-पाली.