पनवेलमध्ये आज २ रुग्ण आढळल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये ६४ कोरोनाबाधित

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात खांदा कॉलनीतील महिला वैद्यकीय अधिकारी आणि नवीन पनवेल येथील सफाई कामगाराचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात आज २ रुग्णांची वाढ झाली आहे.

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात खांदा कॉलनीतील महिला वैद्यकीय अधिकारी आणि नवीन पनवेल येथील सफाई कामगाराचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात आज २ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ४४ पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. पनवेल तालुक्यात एक रुग्ण वाढला आहे.  त्यामुळे तालुक्यात रुग्णांची संख्या ५२  तर रायगड जिल्ह्यामध्ये ६४ झाली आहे. महापालिका क्षेत्रातील बहतांश रुग्ण हे मुंबईत अत्यावश्यक सेवेत काम करणारे असल्याचे दिसून येत आहे. 

नवेल महापालिका क्षेत्रातील नवीन पनवेल सेक्टर १३ मधील ५१ वर्षीय व्यक्ती मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होती.  खांदा कॉलनीतील महिला डॉक्टर  मुंबईच्या मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये वैद्यकीय अधिकारी आहेत. दोन्ही रुग्णांना ते काम करीत असलेल्या कामाच्या ठिकाणी  संसर्ग झाला असल्याचा अंदाज आहे. पनवेल महापालिका हद्दीतील ५८९  जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी ५०० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ४५ जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी खारघर २ , कामोठे ३ आणि कळंबोलीतील १० असे १५ जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पनवेल तालुक्यातील भिंगारवाडी येथील ६१ वर्षीय व्यक्तीने खांदा कॉलनीतील अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला होता. तिला कोरोनाची लागण झाली आहे.या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी तिघांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.त्यामुळे पनवेल तालुक्यात आता कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ५२ झाली आहे.तालुक्यातील ८  पैकी ५ रुग्ण बरे  झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती उप विभागीय अधिकारी दत्ता नवले यांनी दिली. रायगड जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ६४ झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात सापडलेले पॉझिटिव्ह रुग्ण हे सुरूवातीला परदेश प्रवासाचा इतिहास असलेले किवा त्यांच्याशी संबंधित होते . पण आता सापडत असलेले रुग्ण मुख्यत: मुंबईत अत्यावश्यक सेवेत असलेले आहेत.