पनवेल तालुक्यातील मौजे पालीदेवद (सुकापूर) परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित

पनवेल :पनवेल तालुक्यातील मौजे पालीदेवद( सुकापूर) येथील निम्बेश्वरकुंज सोसायटी, पालीदेवद (सुकापूर) व त्यापासूनचा पूर्वे देवद गावाची हद्द, पश्चिमेस अय्यपा मंदिर,दक्षिणेस

 पनवेल : पनवेल तालुक्यातील  मौजे पालीदेवद( सुकापूर)  येथील निम्बेश्वरकुंज सोसायटी, पालीदेवद (सुकापूर)  व त्यापासूनचा पूर्वे देवद गावाची हद्द, पश्चिमेस अय्यपा मंदिर,दक्षिणेस किडस गार्डन शाळा व उत्तरेस नवजीवन सोसायटी हा परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील २८ दिवस हे क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास रायगड जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्याच्या  आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण  अध्यक्ष  निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.  या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ७१, १३९ तसचे भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल,असेही सांगण्यात आले आहे.