पनवेल तालुक्यात आज आढळले १६ कोरोनाबाधित

पनवेल : पनवेल तालुक्यात उलवे येथे ४ आणि विचुंबे येथे ३ अशा ७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात ९ पॉझिटिव्ह रुग्ण असुन त्यापैकी कामोठ्यात ५ ,खारघर २, पनवेल आणि

पनवेल : पनवेल तालुक्यात उलवे येथे ४ आणि विचुंबे येथे ३ अशा ७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात ९ पॉझिटिव्ह रुग्ण  असुन  त्यापैकी  कामोठ्यात ५ ,खारघर २, पनवेल आणि नवीन पनवेल प्रत्येकी १ रुग्ण सापडला.पनवेलच्या मध्यवर्ती भागात रुग्ण सापडल्याने नागरिकात घबराट पसरली आहे . आज तालुक्यात कोरोनाचे १२६ रुग्ण तर महापालिका क्षेत्रात १०२ रुग्ण झाले आहेत. 

पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे  सेक्टर -१२  येथील ४५  वर्षीय व्यक्ती मुंबईला रुग्णवाहिकेवर चालक आहे.  त्याठिकाणी तिला संसर्ग झाला आहे. कामोठे सेक्टर १०  मधील ३८ वर्षीय व्यक्ती मुंबईला शताब्दी हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय आहे. सेक्टर ११ मधील ६ महिन्याच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली असून त्याच्या घरातील ३ व्यक्तींना यापूर्वी कोरोनाची बाधा झाली आहे.  कामोठे  सेक्टर – ३४  मधील २९ वर्षीय महिला मुंबईला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नर्स आहे तिला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे . कामोठे सेक्टर ६ मधील ४२ वर्षीय व्यक्तीला  कोरोनाचा संसर्ग झाला असून तो गोवंडी येथील यू.एस.व्ही फार्मा कंपनीत कामाला आहे. या कंपनीतील तिघांना आणि त्यांच्या घरातील व्यक्तींना यापूर्वी संसर्ग झालेला आहे.
नवीन पनवेल सेक्टर ४ मधील ५४ वर्षीय व्यक्तीला कोरांनाची बाधा झाली असून ती रिलायन्स मध्ये कामाला आहे त्याठिकाणी तिला संसर्ग झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे .पनवेल शहरातील एम.जी रोड वरील टपाल नाका येथे राहणार्‍या २९ वर्षीय मुंबई पोलीस कर्मचार्‍याला कोरोनाची बाधा झाली आहे. हा पनवेलचा मध्यवर्ती परिसर असल्याने आता पनवेलकरांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आजपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील ११०७ जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी ३२ जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी ६२ जणांवर  उपचार सुरू असून ३८  जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 पनवेल ग्रामीण मध्ये आज ७ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये विचुंबे मधील ३ आणि ४  उलवे मधील आहेत. विचुंबे  येथिल ॐकार पार्क मधील एकाच घरातील २९ वर्षीय आणि २५ वर्षीय महिला आहेत. यापूर्वी यांच्या घरातील पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता घरात ७० वर्षीय व्यक्ति आणि ३ वर्षाची मुलगी आहे. सोसायटीत सर्वांनी दारे बंद केल्याने त्यांच्या खाण्याची व्यवस्था गट विकास अधिकारी तेटगुरे यांनी ग्रामसेवकांना करायला सांगितली आहे. विचुंबे मधील साई दर्शन अपार्टमेंट मधील ३५ वर्षीय व्यक्ती मुंबई महानगर्पालिकेत सफाई कामगार आहे त्याला ही  कोरोंनाची बाधा झाली आहे.  उलवे नोड सेक्टर ८  मधील रिध्दी – सिध्दी सोसायटीतील आई ५ वर्षाचा मुलगा आणि १ वर्षाच्या मुलीचा रिपोर्ट कोरोंना पॉझिटिव्ह आला आहे.उलवे नोड सेक्टर ३ मध्ये राहणार्‍या वाहतूक पोलिसालाही कोरोनाची बाधा झाली आहे आतापर्यंत ग्रामीणमध्ये २४ कोरोना रुग्ण झाले आहेत