पनवेलमध्ये आज ११ जणांना कोरोनाची बाधा, रायगड जिल्ह्यात १६७ कोरोनाबाधित

पनवेल : पनवेल तालुक्यात आज विचुंबे येथील ३ वर्षाच्या मुलीसह ५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच महापालिका क्षेत्रात कामोठा आणि खारघरमध्ये प्रत्येकी ३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये मुंबई

पनवेल : पनवेल तालुक्यात आज विचुंबे येथील ३ वर्षाच्या मुलीसह ५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच महापालिका क्षेत्रात कामोठा आणि खारघरमध्ये प्रत्येकी ३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये मुंबई पोलीस दलातील एका उप निरीक्षकाचा समावेश आहे. आज पनवेल तालुक्यात ११ आणि महाड तालुक्यात १ कोरोना रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १६७ असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात खारघर आणि  कामोठेमध्ये तीन कोरोंनाचे रुग्ण सापडले आहेत. खारघर सेक्टर -३५ ई जायनी  सोसायटीतील ४६ वर्षीय महिलेच्या पती आणि मुलाला या अगोदरच कोरोनाची बाधा झाली आहे. सेक्टर १० मधील कोपरा गावामधील ४१ वर्षीय व्यक्ती एपीएमसी मार्केटमध्ये टेम्पो चालक आहे. त्याला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. सेक्टर १३ मधील बालाजी हाईटमधील ४२ वर्षीय व्यक्ति डायलिसिसकरिता सानपाडा येथील सूरज हॉस्पिटल मध्ये गेली होती . त्या ठिकाणी तिला संसर्ग झाला असावा. कामोठे येथील सेक्टर १४ मधील मीरा प्रभू निवासात राहणारी ४६ वर्षीय  गोवंडी आगारातील बेस्ट चालकाला त्याच्या कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा. सेक्टर २५ मधील स्काय गोल्ड अपार्टमेंटमध्ये रहाणारे वडाळा पोलीस ठाण्यातील उप निरीक्षकाना त्यांच्या कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा. सेक्टर १८ मधील सिल्व्हर पार्क ५८ वर्षीय व्यक्ती वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये काम करते. त्या ठिकाणच्या कार्यालयीन प्रमुखाला कोरोना झाला असल्याने त्यापासून या व्यक्तिला संसर्ग झाला असावा. आजपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील १२१७  जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी ११ जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी ७० जणांवर उपचार सुरू असून ४१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये आज ५ नवीन रुग्ण सापडले आहेत.  त्यामध्ये उसर्ली खुर्द मधील एका ३० वर्षीय  महिलेला कोरोनाची बाधा झाली असून ती एनजीओतर्फे गोवंडी भागात स्क्रिनिगचे काम करीत होती. विचुंबे येथील  ॐकार पार्कमधील ३ वर्षाची मुलीला कोरोनाची बाधा झाली  असून यापूर्वी तिच्या आई – वडिलांसह घरातील तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे . डेल्टा टॉवर सेक्टर ८ मधील ३१ वर्षीय रखवालदाराचे काम करणार्‍या व्यक्तिला कोरोनाची बाधा झाली आहे. आकुर्ली  येथील पनवेल पॅरेडाईजमध्ये राहणार्‍या बीव्हीजी रुग्णवाहिका सेवेचे जिल्हा व्यवस्थापक असलेल्या व्यक्तिला कोरोनाची बाधा झाली आहे. उलवे येथील सेक्टर ५ येथील व्हिनस आर्कीडमधील मुंबईला रुग्णवाहिका डॉक्टर असलेल्या ३२ वर्षीय व्यक्तिला कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ग्रामीणमध्ये १३४ जणांची तपासणी करण्यात आली असून ६ जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. कोरोनाच्या ३२ रुग्णांपैकी ५ जण बरे झाले आहेत .