मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्यावरील चहावाल्याला कोरोनाचा संसर्ग -पनवेल तालुक्यात २३ नवे रुग्ण

पनवेल : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्यावरील चहावाल्याचा संसर्ग पनवेलपर्यंत पोहचला. विचुंबे येथील रुग्ण मातोश्री बंगल्यावर कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात ७ मे रोजी २३ नवीन रुग्ण सापडले

 पनवेल : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्यावरील चहावाल्याचा संसर्ग पनवेलपर्यंत पोहचला. विचुंबे येथील रुग्ण मातोश्री बंगल्यावर कार्यरत आहे.  पनवेल तालुक्यात ७ मे रोजी २३ नवीन रुग्ण सापडले असून त्यापैकी महापालिका क्षेत्रात १७ तर ग्रामीण मध्ये ६ रुग्ण आहेत. महापालिका क्षेत्रात कामोठयातील ८ , पनवेल आणि नवीन पनवेल मध्ये पत्येकी ३ रुग्णांचा समावेश आहे.  तालुक्यात कोरोनाचे १६८  रुग्ण तर महापालिका क्षेत्रात १३०  रुग्ण झाले आहेत. रायगड जिल्ह्यात आज इतर तालुक्यात नवीन रुग्ण नसल्याने एकूण रुग्णांची संख्या १९० झाली आहे 

पनवेल महापालिका  कामोठे मध्ये ८ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी सेक्टर ६ मधील दोन कुटुंबातील ५ व्यक्तींचा समावेश आहे . त्यांच्या कुटुंब प्रमुखांना यापूर्वी बाधा झालेली आहे. सेक्टर ११ मधील  आशियाना कॉम्प्लेक् मधील व्यक्ति चेंबुरला जैन हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या उपचारासाठी गेली असता  तिला संसर्ग झाला असावा . सेक्टर ३५ मधील संकल्प सोसायटीतील महिलेचा पती बेस्टमध्ये चालक आहे. त्याच्या पासून तिला संसर्ग झाला आहे. कळंबोली ३ ई ५८  वर्षीय व्यक्ति गोवंडी  डेपोत वाहक आहे. खारघर घरकुल सेक्टर १५  मधील १ महिला किडनीच्या उपचारासाठी नेरूळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात गेली होती. खारघर ३५ ई मधील जयानी बिल्डिंग मधील महिलेला कोरोनाची बाधा झाली असून तिच्या  कुटुंबातील ३ व्यक्तींना या अगोदर कोरोनाची बाधा झाली होती. 
   पनवेलमधील पारिजात सोसायटी उरण नाका  येथील ३७  वर्षीय व्यक्ती ठाण्याला टीसीएस कंपनीत कामाला आहे तिला त्या ठिकाणी संसर्ग झाला असावा .नेरूळ येथील मीनाताई हॉस्पिटलमध्ये नर्स असणार्‍या पनवेळच्या तुळशीधाम सोसायटीत राहणार्‍या महिलेला  कोरोनाची बाधा झाली आहे . पनवेलच्या ५२ बंगलो मधील परमेश्वरी निवासमधील महिला कोरोनाबाधित झाली आहे ती नवी मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. नवीन पनवेल सेक्टर १६ मधील पोदी न्ंबर २ मध्ये  राहणार्‍या नवी मुंबई महापालिकेतील हॉस्पिटलमध्ये  सफाई कामगार असणार्‍या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला  आहे.  सेक्टर ४ मधील पुष्पमाला सोसायटीतील २ महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या घरातील व्यक्ति यापूर्वीच पॉझिटिव्ह आली आहे  गुरुवार पर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील १२८४   जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी २१  जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी ८७  जणांवर  उपचार सुरू असून ४१  रुग्ण  बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
          पनवेल ग्रामीण मध्ये गुरुवारी ६  नवीन रुग्ण सापडले आहेत.  त्यामध्ये करंजाडे सेक्टर आर – १ येथील सविता बिल्डिंग मधील आणि सेक्टर ४ मधील मैथिली होम्स मधील महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत . आराध्या रेसिडेन्सीमधील मुंबई महापालिकेत काम करणार्‍या ५४ वर्षीय व्यक्तिला कोरोनाची बाधा झाली आहे. उलवे सेक्टर ५ मधील मोरेश्वर सोसायटीतील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणार्‍या महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे . पाली देवद सुकापुर  येथील बालाजी लाईफ स्टाईल मधील पोलिस कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. विचुंबे येथील गंगा रिजेन्सी मधील  व्यक्ति  मुख्यमंत्र्यांच्या  मातोश्री बंगल्यावर कार्यरत आहे. त्याला चहावाल्यापसून संसर्ग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे 
आतापर्यंत ग्रामीण मध्ये १५५  जणांची तपासणी करण्यात आली असून २० जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. कोरोनाच्या ३८  रुग्णांपैकी ५ बरे झाले आहेत .  रायगड जिल्ह्यात आज पनवेल सोडून इतर तालुक्यात नवीन रुग्ण नसल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १९० झाली आहे