पनवेल तालुक्यात कोरोनाचे ४० रुग्ण

पनवेल : पनवेल तालुक्यात आज विचुंबे येथे वास्तव्यास असणार्‍या आणि मुंबईला नोकरीला जाणार्‍या परराज्यातील व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यात

 पनवेल :  पनवेल तालुक्यात आज विचुंबे येथे वास्तव्यास असणार्‍या आणि मुंबईला नोकरीला जाणार्‍या परराज्यातील व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यात कोरोनाचे ४० रुग्ण झाले असून पनवेल महापालिका क्षेत्रात एकही नवीन रुग्ण आढळलेला नसल्याने पनवेलकरांना दिलासा मिळाला आहे . पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारी नवीन रूग्ण न सापडल्याने आज दिलासा मिळाला आहे . शनिवारी कामोठे , खांदा कॉलनी( नवीन पनवेल ) , आणि खारघरमध्ये कोरोना रुग्ण सापडले होते. त्याठिकाणी महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे. पनवेल महापालिका हद्दीतील ३९३ जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी ३३४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून २५ जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी ५ जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विचुंबे येथील मूळच्या तामिळनाडू मधील व्यक्तिचा रिपोर्ट  कोरोंना पॉझिटिव्ह आला आहे. तो मुंबईला बी.पी.टी .मध्ये कामाला आहे. मुंबई – पनवेल प्रवासा दरम्यान त्याला संसर्ग झाल्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. पनवेल मध्ये यापूर्वी  पॉझिटिव्ह असलेल्या १० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याने रविवारी पुन्हा त्यांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. हे रिपोर्ट  निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी पाठवण्यात येईल असे सांगण्यात येते.