पनवेलमध्ये आज २ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात आज २ नवीन रुग्ण सापडले आहेत त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ३९ पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. पनवेल तालुक्यात मंगळवारी एकही नवीन रुग्ण सापडलेला

 पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात आज २ नवीन रुग्ण सापडले आहेत त्यामुळे  महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ३९ पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. पनवेल तालुक्यात मंगळवारी एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही.पनवेल महापालिका क्षेत्रात मंगळवारी खारघर आणि कामोठा येथे नवीन रुग्ण सापडले आहेत . खारघर येथे पॉझिटिव्ह  आलेला रुग्ण हा पोलीस कर्मचारी असून तो रोज खारघर ते बांद्रा असा प्रवास कामानिमित्त करीत  होता. कामोठे येथील ५९ वर्षाची व्यक्ती अगोदरपासून मूत्र विकाराचा व रक्त दाबाचा त्रास असणारी आहे.  महापालिका क्षेत्रात कोरोना पोझिटिव्हची संख्या ३९  झाली आहे. सोमवारी खांदा कॉलनीतील अष्टविनायक हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि तेथे उपचारासाठी आलेल्या कळंबोलीतील एक व्यक्ती आणि खारघर मधील एका व्यक्तीचा  रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता.

पनवेल महापालिका क्षेत्रात एकूणदोन रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. .पनवेल महापालिका हद्दीतील ४७७  जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी ४२२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून १६ जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटिव्हपैकी खारघर २ , कामोठे ३ आणि कळंबोलीतील ८ असे  १३  जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पनवेल तालुक्यात एकही नवीन रुग्ण सापडलेला नसल्याची आणि विचुंबे येथे  रविवारी सापडलेल्या पोझिटीव्ह रुग्णाच्या नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले  सल्याची  माहिती उप विभागीय अधिकारी दत्ता नवले  यांनी दिली.