पनवेलमधील एका गरोदर महिलेचा कोरोनाची लागण

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथील येथील एका गरोदर महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात आज एका रुग्णाची वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिका

 पनवेल :  पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथील येथील एका गरोदर महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पनवेल  महापालिका क्षेत्रात आज एका रुग्णाची वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ४० पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. पनवेल तालुक्यात बुधवारी एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही. पनवेल महापालिका क्षेत्रात  कामोठा येथे एका गरोदर महिलेला कोरोंना झाल्याचा रिपोर्ट आला आहे. ही महिला २० एप्रिलपासून फोर्टिस हॉस्पिटल , मुलुंड येथे दाखल असून तिला हृदयविकाराचा त्रास असल्याचे समजते. पनवेल महापालिका हद्दीतील ४८९  जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी ४२२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून २७ जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी खारघर २ , कामोठे ३ आणि कळंबोलीतील ९  असे  १४  जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पनवेल आणि उरण  तालुक्यात एकही नवीन रुग्ण सापडलेला नसल्याची माहिती उप विभागीय अधिकारी दत्ता नवले यांनी दिली. त्यामुळे पनवेल तालुक्यात आता कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४५  झाली आहे.