पनवेलमध्ये २ डॉक्टर आणि १ महिला सफाई कामगार कोरोनाबाधित

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथील महिला डॉक्टर, महिला सफाई कामगार आणि तालुक्यातील उलवे येथील डॉक्टरचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात आज २ रुग्णांची वाढ झाली

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथील महिला डॉक्टर, महिला सफाई कामगार आणि तालुक्यातील उलवे येथील डॉक्टरचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात आज २ रुग्णांची वाढ झाली आहे. तर एकजण पनवेल तालुक्यातील आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ४२ रुग्ण झाले आहेत. पनवेल तालुक्यातील रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. आजचे तिन्ही रुग्ण मुंबईत  हॉस्पिटलमध्ये काम करणारे आहेत 

पनवेल महापालिका क्षेत्रातील  कामोठा सेक्टर ३६ मधील राजावाडी  हॉस्पिटल मध्ये कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरचा आणि कामोठे सेक्टर ११ मधील मुंबईच्या के.ई.एम  हॉस्पिटल मध्ये सफाई कामगार म्हणून असलेल्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दोन्ही महिलाना त्या काम करीत असलेल्या हॉस्पिटल मधून संसर्ग झाला असल्याचा अंदाज आहे . पनवेल महापालिका हद्दीतील ५४२ जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी ४६५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ३५ जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी खारघर २ , कामोठे ३ आणि कळंबोलीतील १० असे १५ जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पनवेल तालुक्यातील  उलवे येथील सेक्टर २५ मध्ये मुंबईच्या के.ई.एम  हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन हेड म्हणून काम करणार्‍या डॉक्टरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असून त्याने सोमवारी काही रुग्ण तपासले असल्याचे ही  समजते. त्या डॉक्टरच्या आई आणि पत्नीची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. पनवेल तालुक्यातील ७ पैकी ५ रुग्ण बरे  झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती  माहिती उप विभागीय अधिकारी दत्ता नवले यांनी दिली. त्यामुळे पनवेल तालुक्यात आता कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४९  झाली आहे.