पनवेलमध्ये आज ५ कोरोनाबाधितांची नोंद , रायगड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या पोहोचली ७० वर

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथे ४ आणि नवीन पनवेलमध्ये एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात आज ५ रुग्णांची वाढ झाली आहे.

 पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथे ४ आणि नवीन पनवेलमध्ये एका व्यक्तीचा रिपोर्ट  कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात  आज ५  रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ४९ पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये एक रुग्ण वाढला आहे.  त्यामुळे तालुक्यात रुग्णांची संख्या ५८ तर रायगड  जिल्ह्यामध्ये ७० झाली आहे. 

पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे येथील ५३ वर्षीय पोलीस असलेली व्यक्ती मुंबई येथे कामाला असून त्याच्यावर कॅन्सरचे उपचार ही सुरू होते.  तो रोज कामोठे ते सी.एस.टी असा बसने प्रवास करित होता. त्याला प्रवासात किंवा कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा अंदाज आहे.  दुसरी व्यक्ति ४४ वर्षीय महिला असून ती सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई हॉस्पिटल मध्ये सफाई कामगार आहे. भाभा हॉस्पिटल कुर्ला येथे तिच्यावर १६ एप्रिलपासून उपचार सुरू आहेत.  तिसरी २९ वर्षीय व्यक्ती  ट्रॉम्बे म्युनिसिपल डिस्पेन्सरीत फार्मासिस्ट म्हणून काम करीत आहे. त्याला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा  अंदाज आहे. त्याच्यावर पनवेलच्या उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  कामोठे सेक्टर १५ येथील चौथी ३७ वर्षीय व्यक्ती आय – टीव्ही भारतची पत्रकार म्हणून काम करीत आहे. सध्या या व्यक्तिला फर्म हॉटेल गोरेगाव येथे विलगीकरण कक्षात ठेवले आहे. नवीन पनवेल येथील २७ वर्षीय महिला सायन हॉस्पिटल , मुंबई येथे स्टाफ नर्स असून तिच्यावर सेव्हन हिल हॉस्पिटल, मुंबई येथे उपचार सुरू आहेत.   

पनवेल ग्रामीणमध्ये सुकापुर येथील ३४ वर्षीय निंबेश्वर सोसायटीतील बी.एम.सी मध्ये कामाला असणार्‍या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. पनवेल महापालिका हद्दीतील ६३१  जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी ५३३५  जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ४७ जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत.  सायन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेली व्यक्ती पूर्ण बरी झाल्याने घरी पाठवण्यात आले. कोरोना पॉझिटीव्हपैकी खारघर ३  , कामोठे ३ , घोट १ आणि कळंबोलीतील १० असे १७ जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.नेरूळ येथील डि.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाची अंतिम चाचणी निगेटिव्ह येऊन बरी झालेल्या महिलेचे हृदयविकार आणि किडनी निकामी झाल्याने  निधन  झाले. पनवेल तालुक्यातील  सुकापूर  येथील३२ वर्षीय निंबेश्वर सोसायटीतील बी.एम.सी मध्ये कामाला असणार्‍या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ति  आणि  कामोठयातील  पॉझिटीव्ह हे मित्र आहेत . त्यामुळे पनवेल तालुक्यात आता कोरोंना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ५८  झाली आहे.पनवेल ग्रामीणमध्ये ९ पैकी ५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती उप विभागीय अधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली. रायगड जिल्ह्यात इतर तालुक्यात नवीन रुग्ण सापडलेला नाही. जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ७०  झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नोकरी व्यवसायासाठी नागरिक मुंबईला जात असतात. त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे .