दिलासादायक: पनवेल तालुका आणि महानगरपालिका क्षेत्रात सलग २ दिवस एकाही कोरोना रुग्णाची नाही नोंद

पनवेल : पनवेल तालुका आणि महापालिका क्षेत्रात आज एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे सलग दोन दिवस तालुक्यात आणि महापालिका हद्दीत एकही रुग्ण सापडलेला नाही . पनवेल महापालिका क्षेत्रात

पनवेल : पनवेल तालुका आणि महापालिका क्षेत्रात आज  एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे सलग दोन दिवस तालुक्यात आणि महापालिका हद्दीत एकही रुग्ण सापडलेला नाही . पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्हची संख्या २६  असून उलवेमधील ४ रुग्णांमुळे पनवेल तालुक्यात ३० तर उरण  मधील  २ पॉझिटिव्हमुळे रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३२  झाली आहे . तपासणीसाठी पाठवलेल्या ३६४ नमुन्यांपैकी ३१२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ११  जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत.  कोव्हिड १९ चे ४ रुग्ण बारे झाले असून एकाच मृत्यू झालेला आहे .खारघर येथील  ग्रामविकास भवनातील  केअर सेंटरमध्ये २०  जण आहेत तर उप जिल्हा रुग्णालयात २३ आणि एम.जी.एम हॉस्पिटल कामोठे येथे १७ जण उपचार घेत आहेत. पनवेल महापालिका हद्दीत चार निवारा केंद्रात १८४ नागरिकांना ठेवण्यात आले आहे. त्यांना अल्पोपहार ,चहा आणि जेवण महापालिकेने स्थापन केलेल्या कम्युनिटी किचनद्वारे दिले जाते.