पनवेल तालुक्यात आज ३ कोरोनाबाधितांची नोंद

पनवेल : पनवेल तालुक्यात ३ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यातील दोघे मुंबईला अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी २७ एप्रिल रोजी महानगरपालिका क्षेत्रात २ आणि ग्रामीणमध्ये एकाचा कोरोंना

 पनवेल : पनवेल  तालुक्यात ३ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यातील दोघे मुंबईला अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी २७ एप्रिल रोजी महानगरपालिका क्षेत्रात २ आणि ग्रामीणमध्ये एकाचा कोरोंना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये २  नवीन कोरोना रुग्ण सापडल्याने महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ५८  पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. पनवेल तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८  झाली आहे.  पनवेल शहर आणि ग्रामीण भागातून  हजारो व्यक्ति मुंबईला जात आहेत . ग्रामीणमधील एकट्या सुकापूरमधून अत्यावश्यक सेवेसाठी रोज २०० कर्मचारी मुंबईत जात असल्याचा सर्व्हेचा अहवाल आहे. त्यामुळे पनवेल तालुका कोरोना ज्वालामुखीच्या तोंडावर आहे असेच म्हणावे लागेल          

पनवेल महापालिका क्षेत्रातील नवीन पनवेल  सेक्टर ६ मधील आर्मी रिटायर्ड व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नवीन पनवेलमधील पॅनेसिया हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्यासाठी गेल्यामुळे या व्यक्तिला संक्रमण झाले असावे, असा अंदाज आहे. कळंबोली येथील एल.आय.जी. कॉलनीतील ३९ वर्षीय व्यक्ती मुंबई महापालिकेत सफाई कामगार आहे तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कामाच्या ठिकाणीच तिला संसर्ग झाल्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत  पनवेल महापालिका हद्दीतील ७२४  जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी २२ जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी ३२  जणांवर  उपचार सुरू असून  २४  जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये मंगळवारी एक नवीन रुग्ण सापडला . गव्हाण /कोपर  येथील शिवाजीनगर सेक्टर १० मधील  महिला मुंबईला हॉस्पिटलमध्ये नर्स आहे . तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे  तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ६८ झाली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये १०  पैकी ५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून आणखी दोघांना उद्या पर्यंत घरी सोडण्याची शक्यता आहे. पनवेलहुन मुंबईला  अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसत आहे. पनवेल तालुक्यातील सुकापुरमधून २०० कर्मचारी अत्यावश्यक सेवेसाठी रोज मुंबईला जात असल्याचे ग्राम पंचायत सर्व्हेमध्ये दिसून आले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातून आणि शहरातून रोज मुंबईला जाणार्‍या या हजारो अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांमुळे पनवेलमध्ये कोरोना संक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे.