पनवेलमध्ये आज १२ कोरोनाबाधितांची नोंद

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात आज १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने घबराट पसरली असून आजच्या रुग्णामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाऊन पॉझिटिव्ह झालेल्यांच्या घरातील ८ जणांचा समावेश

पनवेल : पनवेल  महापालिका क्षेत्रात आज १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने घबराट पसरली असून आजच्या रुग्णामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाऊन पॉझिटिव्ह झालेल्यांच्या घरातील ८ जणांचा समावेश असल्याने आमदार प्रशांत ठाकुर यांनी मुंबईला जाणार्‍यांची रहाण्याची सोय कामाच्या ठिकाणीच करावी ही  मागणी योग्य असल्याचे दिसून आले आहे.पनवेल  महापालिका क्षेत्रात कोरोनाचे आता ८१ पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. ग्रामीणमध्ये नवीन रुग्ण नसल्याने  पनवेल तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९२  झाली आहे. 

आजच्या कोरोना पॉझिटिव्हमध्ये  ४ कामोठे, ४ नवीन पनवेल , २ खारघर आणि कळंबोलीमध्ये २  दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये  पुर्वीच्या कोरोना पॉझिटिव्हच्या घरातील ८ जणांचा समावेश आहे. तर तिघांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा शक्यता आहे . पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे मध्ये आज ४ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यापैकी एक सेक्टर २१ मधील पोलिस कर्मचारी असून तो मुंबईला करायर्त होता. सेक्टर १०  मधील २१ आणि १३  वर्षीय व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असून त्यांची आई  मुंबई महापालिकेत सफाई कामगार आहे ती यापूर्वी कोरोंना पॉझिटिव्ह आहे  आणि सेक्टर ९ मधील ३४  वर्षीय व्यक्ति मुंबईला सायन हॉस्पिटल मध्ये एम.आर.आय  टेक्निशियन आहे.त्याला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याची शक्यता आहे.  नवीन पनवेल  सेक्टर १३ मधील एका मुंबई पोलीस दलातील कर्मचार्‍याच्या घरातील दोन मुलीं आणि  आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या पोलिसाचा रिपोर्ट यापूर्वी पॉझिटिव्ह होता त्यामुळे यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. खारघर ओवे  सेक्टर ३५ मधील २२ वर्षीय व्यक्ति मॉजिस्टिक ग्रुप ऑफ कंपनीज कोपरखैरणे येथे कामाला असून त्याच्या कार्यालय प्रमुख आणि कुटुंबातील ३ सदस्यांना कोरोना झाला होता. खरघर स्वप्नपूर्ती मधील १ व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे.  कळंबोली येथील पूर्वी  कोरोंना पॉझिटिव्ह असलेल्या पोलिसाच्या घरातील आई आणि मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  शुक्रवारपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील ९५३  जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी ९२ जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्ह पैकी ५१ जणांवर  उपचार सुरू असून २८  जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आता पर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये शुक्रवारी एकही  नवीन रुग्ण सापडलेला नाही. तालुक्यात कोरोंना पोझिटीव्ह रुग्णांची संख्या ९२  झाली असून पनवेल ग्रामीणमध्ये ११ पैकी ५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.