पनवेल तालुक्यात आज ११ नवीन कोरोनाबाधित सापडल्याने रुग्णांचा आकडा शंभरी पार

पनवेल :पनवेल तालुक्यात २ आणि महापालिका क्षेत्रात ९ पॉझिटिव्ह रुग्ण आज सापडल्याने तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांचे शतक पूर्ण झाले आहे. आजच्या रुग्णांमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाऊन

 पनवेल :पनवेल तालुक्यात २ आणि महापालिका क्षेत्रात ९ पॉझिटिव्ह रुग्ण आज सापडल्याने तालुक्यात  कोरोनाच्या रुग्णांचे शतक पूर्ण झाले आहे. आजच्या रुग्णांमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाऊन पॉझिटिव्ह झालेल्यांच्या घरातील ७  रुग्णांचा  समावेश आहे. गोवंडी येथील यू.एस.व्ही  फार्मा कंपनीतील  कामगार किवा त्यांच्या घरातील व्यक्तींचा समावेश आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोंनाचे आता ९० पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. ग्रामीणमध्ये नवीन रुग्ण नसल्याने पनवेल तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०४  झाली आहे.

आजच्या पॉझिटिव्हमध्ये ७ कामोठे, १ नवीन पनवेल आणि कळंबोलीमध्ये १ चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये  पूर्वीच्या कोरोना पॉझिटिव्हच्या घरातील ७ जणांचा समावेश आहे. तर एकाला  कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा शक्यता आहे . पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे मध्ये आज ७  रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यापैकी सेक्टर ७ मधील रुग्णाचे वडील मुंबईत सफाई कामगार असून त्यांना कोरोंनाची लागण झाली होती. सेक्टर ७ मधील महिला मुंबईला सेंट जॉर्ज हॉस्पिटल मध्ये नर्स आहे . सेक्टर २१ मधील ३३ वर्षीय महिला आणि तिची ७ वर्षीय आणि १ वर्षीय मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेचा पती गोवंडी  येथील यू.एस.व्ही  फार्मा  कंपनीत कस्टम व्यवस्थापक आहे. त्याचा रिपोर्ट  कोरोना पॉझिटिव्ह होता. सेक्टर ११ मधील ३२ वर्षीय महिलेचा भाऊ मुंबईला महानगरपालिकेत सफाई कामगार असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. सेक्टर ३४ मधील ३६ वर्षीय व्यक्ति गोवंडी येथील यू.एस.व्ही फार्मा कंपनीत कामाला आहे. या कंपनीत कोरोंना पॉझिटिव्ह असल्याने त्या ठिकाणीच  त्याला संसर्ग झाला असावा.   
         नवीन पनवेल  सेक्टर १७  मधील २२ वर्षीय महिला मेंदू विकाराच्या तपासणीसाठी मुंबईला सायन हॉस्पिटल मध्ये गेली असताना तिला संसर्ग झाला असावा.  कळंबोली  सेक्टर ४ मधील;  ३५ वर्षीय व्यक्तिचा भाऊ पोलीस कर्मचारी असून त्याच्यामुळे याला संसर्ग झाला असावा. शनिवारपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील १०१०  जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी ६४  जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी ५६  जणांवर  उपचार सुरू असून ३२  जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आज २  नवीन रुग्ण सापडले आहेत. उसर्ली येथील मोरया सोसायटीतील मुंबईला फार्मा कंपनीत जाणारी व्यक्ती आणि विचुंबे येथील मोरया पार्क मधील मुंबईला सफाई कामगार असलेलली  एक व्यक्ति  कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे . तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १०४  झाली असून  पनवेल ग्रामीणमध्ये १४  पैकी ५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गोवंडी येथील यू.एस.व्ही  फार्मा कंपनीतील कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे  दिसत असल्याने या कंपनीतील कामगार आणि त्यांचे नातेवाईक भयभीत झाले आहेत