पनवेल महापालिका क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीसह कोळीवाडा परिसरातील मच्छी व मटण मार्केट बंद

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील गर्दीची ठिकाणे असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलसह कोळीवाडा परिसरातील मच्छी व मटण मार्केट बुधवारपासून पुढील

 पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील गर्दीची ठिकाणे असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलसह कोळीवाडा परिसरातील मच्छी व मटण मार्केट  बुधवारपासून पुढील आदेश मिळेपर्यंत बंद करण्याचे आदेश पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत.

जगभरात पसरलेल्या करोना  रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने राज्यभर अनेक प्रतिबंधात्मक उपायोजना लागू केल्या. त्यादृष्टीने राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २, ३ व ४ मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग घोषित केला. त्यानुषंगाने कोरोना विषाणू संक्रमण वाढणार नाही यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण व्यवस्था व नियोजन करण्याकरिता स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या करणे आवश्यक आहे, याकरिता सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांनी कोरोना विषाणुंचा  प्रसार व संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने कृषी उत्पन बाजार समिती, पनवेल येथील सर्व भाजी मार्केटपुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. 
 तसेच याठिकाणचे मार्केट पुर्णपणे बंद ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थेच्या पदाधिकार्‍यांची राहणार असून या आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांविरुध्द साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कार्यवाही प्रस्तावित करण्यात येण्याचीही नमूद करण्यात आले आहे.