पनवेलमध्ये पहिल्याच दिवशी ऑनलाईन मद्य विक्रीमुळे अनेकांची फसवणूक ?

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात ऑनलाईन मद्य विक्रीमुळे अनेक मद्यप्रेमी पाहिल्याच दिवशी हजारो रुपयांना फसवले गेल्याचे पाहायला मिळाले. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी ऑनलाईन मद्य विक्रीला परवानगी

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात ऑनलाईन मद्य विक्रीमुळे अनेक मद्यप्रेमी पाहिल्याच दिवशी हजारो रुपयांना फसवले गेल्याचे पाहायला मिळाले. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी ऑनलाईन मद्य विक्रीला परवानगी देणारा आदेश मंगळवारी दिला  त्यामुळे लॉकडाऊन मध्ये घसा कोरडा पडलेल्या अनेक मद्य प्रेमींना आनंद झाला आहे.पण बुधवारी अनेकांना पैसे भरून ही मद्य न मिळाल्याने त्यांचा आनंद मावळला. 

राज्यात मद्य विक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्यानंतरही पनवेल महापालिका क्षेत्रात रेड झोन असल्याने दुकाने उघडण्यास बंदी घालण्यात आली होती. पनवेल महापालिका आयुक्तांनी महापालिका क्षेत्रात कंटेनमेंट झोन वगळून  सायंकाळी  5 वाजेपर्यंत काउंटर विक्री न करता ऑनलाईन सीलबंद मद्य विक्रीला परवानगी दिल्याचा आदेश काढला आहे. यासाठी विक्रेत्याने मद्य घरपोच पुरवठा करण्यासाठी मनुष्यबळ ठेवावे. डिलिव्हरी बॉयला मास्क, ग्लोव्हज सक्तीचे आहेत. कामगारांना फोटोसह ओळखपत्र आवश्यक असेल.त्यांचे थर्मल स्कॅनिंग करणे आवश्यक असेल परवानाधारकाला आपली मागणी व्हॉट्स अॅप, मोबाईल किवा लघु संदेशाद्वारे नोंदवावी, अशा अटी घातल्या होत्या.या अटी पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगून मद्य विक्रेत्यां नी विक्री सुरू केली नव्हती . याचा फायदा घेऊन भामट्यांनी मात्र मद्यप्रेमींना चांगलाच गंडा घातल्याचे समोर आले. बुधवारी सकाळी दरबार वाईनसमोर दोघे जण आले होते. त्यांनी ऑनलाईन २ हजार रुपये भरल्यावर तुमचे पार्सल तयार आहे तुम्ही जीएसटीचे पैसे पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन करून भरलेत की पाठवतो  असे सांगण्यात आले. त्यांनी क्यूआर कोड स्कॅन न करता रोख पैसे देतो सांगितल्यावर त्यांना दरबार वाईनमध्ये या आणि पार्सल घेऊन जा असे सांगितल्याने ते आले असता तेथे वॉचमन शिवाय कोणीच नव्हते. तो फोन नंबर ही बंद येत होता  हे पाहिल्यावर आपण फसवले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. शहरात अशा प्रकारे अनेक जण फसवले गेले असल्याची चर्चा असून त्यांनी अद्याप पोलिसांकडे तक्रार न केल्याने फसवणुकीचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.