पनवेल रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्याची गटारे तुंबली – नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पनवेल : पनवेल रेल्वे स्टेशनकडे नवनाथ नगर जवळून जाणार्‍या रस्त्याची गटारे तुंबली असून त्यामुळे रस्त्याने जाताना दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक बंद करून जावे लागत आहे . नवनाथ

 पनवेल : पनवेल रेल्वे स्टेशनकडे नवनाथ नगर जवळून जाणार्‍या रस्त्याची गटारे तुंबली असून त्यामुळे रस्त्याने जाताना दुर्गंधीमुळे  नागरिकांना  नाक बंद करून जावे लागत आहे . नवनाथ नगरमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत असताना या ठिकाणी महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने  नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . 

शिवाजी चौकातून  पनवेल रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता महापालिकेने नुकताच कॉँक्रीटचा बनवला. या रस्त्याचे काम सुरू असताना तेथील गटारे बंद झाली आहेत. या गटारात पाहिल्याच पावसात पाणी तुंबले आहे . गटारातील घाण अनेक ठिकाणी रस्त्यावर आल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे . बाजूला असलेल्या नवनाथ नगरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडले म्हणून आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी नागरिकांना स्वच्छता कशी पाळावी याचे मार्गदर्शन करण्यात आले होते. 
नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेण्याबद्दल मार्गदर्शन करीत असतानाच महापालिका मात्र  रस्त्याच्या बाजूची गटारे साफ न करता नागरिकांचे आरोग्य  धोक्यात आणत असल्याचे दिसून येत आहे. या तुंबलेल्या गटारामुळे आणि सिडकोच्या वाहनतळाजवळ असलेल्या कचर्‍यामुळे रस्त्यावरून जाणार्‍यांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे.