दारुची दुकाने न उघडल्याने पनवेलमधल्या तळीरामांची निराशा

पनवेल : केंद्र सरकारने पुन्हा १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र यावेळी काही सवलती देण्यात आल्याचे जाहीर केले . त्यामध्ये सगळ्यात महत्वाची सवलत म्हणजे देशातील दारूची दुकाने सुरू करण्यासाठी दिलेली

पनवेल : केंद्र सरकारने पुन्हा १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र यावेळी काही सवलती देण्यात आल्याचे जाहीर केले . त्यामध्ये सगळ्यात महत्वाची सवलत म्हणजे देशातील दारूची दुकाने सुरू करण्यासाठी दिलेली परवानगी. त्यामुळे ४ मे पासून दुकाने उघडणार म्हणून खुशीत असलेल्या पनवेलमधील तळीरामांची दारूची दुकाने न उघडल्याने मात्र घोर निराशा झाली आहे   

केंद्र सरकारने ३ मे रोजीचा लॉकडाऊन संपल्यावर पुन्हा १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवताना कोरोनाच्या प्रभावाप्रमाणे राज्य आणि जिल्हानिहाय रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन जाहीर केले. या झोनना वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंदच ठेवण्यात आली आहे. मात्र वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या कामगार आणि विद्यार्थ्यांना आपल्या गावाला जाण्यासाठी  परवानगी देण्यात आली. याबरोबरच या तिन्ही झोनमध्ये दारूची दुकाने उघडण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे आनंदी झालेल्या तळीरामांनी रविवारची रात्र वियोगही सहन केला. सोमवारी भल्या पहाटे अनेक तळीराम आपापल्या भागातील वाईन शॉप समोर लाईन लावून उभे राहिले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा ही फज्जा उडाला होता. सकाळचे ११ वाजले तरी दुकान न उगडल्याने त्यांच्यात चुळबुळ सुरू झाली.तळीरामांची गर्दी वाढत होती. पण दुकाने काही उघडलीच नाही.  त्यामुळे त्यांची निराशाच झाली. पनवेल तालुक्यात वाईन्स शॉपवाल्यांना उत्पादन शुल्क खात्याने रितसर परवानगी दिल्याशिवाय तसेच कलेक्टरकडुन राज्य उत्पादन शुल्क विभागास आदेश मिळाल्याशिवाय वाईन्स शॉप खुले होणार नसल्याचे समजते.