पनवेल शहरावर पोलिसांची ड्रोन कॅमेराद्वारे नजर, खाडी किनारी भटकणाऱ्या १० जणांना अटक

पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे फिरणार्‍या आणि सोसायटीत गच्चीवर गर्दी करणार्‍यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. २२ एप्रिल रोजी खाडी किनार्‍यावर फिरणारे १० जण ड्रोन

पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे फिरणार्‍या आणि सोसायटीत गच्चीवर गर्दी करणार्‍यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. २२ एप्रिल रोजी खाडी किनार्‍यावर फिरणारे १० जण ड्रोन कॅमेराद्वारेद्वारे लक्षात आल्यावर त्यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आहे. 
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी सुरू करण्यात आली असता त्याद्वारे पनवेल कोळीवाडा येथील काही इसम खाडी किनाऱ्यावर जमत असल्याचे आढळून आल्याने तेथे जावून पोलिसांनी सर्वांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी देखील २२ एप्रिलला काही नागरिक खाडी किनाऱ्यावर फिरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर एकूण १० जणांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व १० आरोपींना अटक केली आहे.  त्याचप्रमाणे ज्या बिल्डींगच्या  टेरेसवर लोक आढळून आले त्या सोसायटीच्या कमिटी सदस्यांना नोटीस देण्यात आली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी नागरिकांना लॉकडाऊन काळात घरीच बसा, घराबाहेर फिरू नका तुमच्यावर ड्रोन कॅमेर्‍याचे लक्ष आहे. आपण बाहेर फिरताना दिसल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला आहे.