पनवेलमधील आणखी एक पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील एका पोलीस कर्मचार्‍याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पनवेलमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाणार्‍या कर्मचार्‍यांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील एका पोलीस कर्मचार्‍याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पनवेलमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाणार्‍या कर्मचार्‍यांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्याबाबत निर्णिय घेऊन पनवेलकरांना संसर्गापासून  वाचवण्याची मागणी जोर धरू लागली आहे .पनवेल  महापालिका क्षेत्रामध्ये १ नवीन कोरोनाचा रुग्ण सापडल्याने महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ५६ पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. पनवेल तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५  झाली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रातील नवीन पनवेल सेक्टर १३ येथे राहाणार्‍या ४६ वर्षीय पोलीस कर्मचार्‍याचा सोमवारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . मुंबई मानखुर्द येथील पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल असल्याने ते रोज पनवेल – मानखुर्द  प्रवास करीत होते. त्यांना कामाच्या ठिकाणी किवा बस प्रवासात संसर्ग झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पनवेल महापालिका हद्दीतील ६९९  जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी २३ जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी ३३ जणांवर उपचार सुरू असून २१ जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. सोमवारी दोघांना घरी पाठवण्यात आले. त्यापैकी एक सी.आय.एस.एफ जवान आणि अष्टविनायक हॉस्पिटलमधील डॉक्टर आहेत. आतापर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये सोमवारी  नवीन रुग्ण सापडलेला नाही . तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ६५ आहे. पनवेल ग्रामीणमध्ये ९ पैकी ५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पनवेलहुन मुंबईला अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संसर्ग वाढू नये यासाठी पनवेल आणि उरण येथून मुंबईला जाणार्‍या कर्मचार्‍यांची राहण्याची सोय मुंबईतच करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आमदार प्रशांत ठाकुर यांचेसह सर्व पक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी केली  आहे