दरोडा टाकणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात पनवेल पोलिसांना यश

पनवेल : जेएनपीटी हायवेवर ट्रक चालक , सुपरवायझर व वॉचमन यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांच्याकडील मोबाईल फोन व रोख रक्कम दरोडा घालुन जबरीने चोरी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात पनवेल

 पनवेल :  जेएनपीटी हायवेवर ट्रक चालक , सुपरवायझर व वॉचमन यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांच्याकडील मोबाईल फोन व रोख रक्कम दरोडा घालुन जबरीने चोरी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात पनवेल पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून दोन मोबाईल , सुझुकी स्कूटर, एक चॉपर आणि रोख रक्कम जप्त केली आहे. 

पनवेल शहर पोलीस ठाणे हददीतील जेएनपीटी हायवेवर टूक चालक , सुपरवायझर व वॉचमन यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील मोबाईल फोन व रोख रक्कम दरोडा घालुन जबरीने चोरी केल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे येथे ११ जून रोजी  रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता . हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी.पोलीस आयुक्त संजय कुमार , पोलीस सहआयुक्त राजकुमार व्हटकर , पोलीस उप आयुक्त अशोक दुधे व सहा.पोलीस आयुक्त रविद्र गिड्डे यांनी विशेष प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या होत्या . वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे  सपोनि. ईशांत खरोटे, पोलीस उप निरीक्षक सुनिल तारमळे  आणि त्यांच्या टीमने  गुप्त बातमीच्या आधारे व तांत्रिक तपासाद्वारे हायवेवर दरोडा घालणार्‍या समसुददीन सहाबुददीन अंसारी,  मोहम्मद नोहीद मो.उबेद खान , शाहीद मोहम्मद रईस खान , नजरे आलम मोहम्मद जरीफ आलम अन्सारी या  ४ आरोपींना २१ जूनला मुंबई येथुन अटक केली आहे व १ विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्हयातील  हव्या असलेल्या इतर दोन आरोपींना खेरवाडी पोलीस स्टेशन , मुंबई येथे जबरी चोरीच्या गुन्हयात १५ जून रोजी अटक करण्यात आली असुन गुन्हयात वापरलेली दुसरी मोटार सायकल खेरवाडी पोलीस स्टेशन , मुंबई येथे जमा आहे .या  दोन्ही आरोपींचा पनवेल शहर पोलीस ताबा घेणार आहेत . या आरोपींपैकी काही आरोपी विरुध्द मुंबई येथे यापुर्वी गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांनी दरोड्याचे आणखीन गुन्हे  केल्याचे तपासात समोर येत असुन आरोपींकडे पोलीस अधिक तपास करीत आहेत .