कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी पनवेलच्या स्थायी समितीने दिली मान्यता

पनवेल : कोरोना विरूढ लढण्यासाठी आवश्यक असलेली जंतूनाशके, किट आणि इतर साहित्य, खरेदी करण्यासाठी आणि तात्पुरत्या स्वरुपात कर्मचारी नेमण्यासाठी लागणार्‍या आर्थिक तरतुदीला मान्यता देऊन

पनवेल : कोरोना विरूढ लढण्यासाठी आवश्यक असलेली जंतूनाशके, किट आणि इतर साहित्य, खरेदी करण्यासाठी आणि  तात्पुरत्या स्वरुपात कर्मचारी नेमण्यासाठी लागणार्‍या आर्थिक तरतुदीला मान्यता देऊन प्रशासनाच्यासोबत लोकप्रतिनिधीही असल्याचे दाखवून दिले असल्याचे आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेनंतर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सांगितले. यासभते पावसाळयापूर्वीच्या नालेसफाईच्या कामांनाही मंजूरी देण्यात आली.   

  पनवेल महापालिकेची स्थायी समितीच्या दोन सभा आज आदय क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात घेण्यात आली.  स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांचे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.  यामध्ये महापालिकेच्या शिल्लक निधीची गुंतवणूक राष्ट्रीयकृत बँकेत करण्यास मंजूरी देण्यात आली. या सभेत कोरोना प्रतिबंधक उपायांसाठी लागणारे किट, जंतू नाशके , हँड ग्लोज, मास्क  इत्यादि खरेदी करण्यास  झालेल्या खर्चास आणि नवीन खरेदीसाठी लागणार्‍या दराला मान्यता देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात प्रभारी आरोग्या अधिकारी, परिचारिका व कर्मचारी उपलब्ध करून घेण्यासही मंजूरी दिली.  
   इंडिया बुल्सच्या कोन येथील इमारती विलगीकरण कक्षासाठी महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामधील उद्वाहन दुरूस्ती आणि देखरेख करण्यासाठीच्या खर्चास सभेत मान्यता देण्यात आली. या सभेत कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी खरेदी करावयाच्या आवश्यक असलेल्या फोमिंग मशीन बाजारात उपलब्ध नसल्याने त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतला. या सभेच्या पूर्वी विरोधकांनी काही प्रस्ताव दिले पण प्रशासनाने स्थायी समितीत अशा पध्दतीने आयत्यावेळी प्रस्ताव देता येत नसल्याने ते स्वीकारले नाहीत. 
 अमृत कार्यक्रमाअंतर्गत पाणी पुरवठा योजना टप्पा ४ फेज -१ करिता उर्ध्ववाहिनी  व वितरण वाहिनी राष्ट्रीय महामार्ग दोन ठिकाणी छेदून पुश थ्रु पध्दतीने टाकण्यास सभेत मंजूरी देण्यात आली आहे . त्याप्रमाणेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी नवीन सिमेंट काँक्रीटीचे रस्ते केले आहेत. त्या ठिकाणी ही पाईपलाईन टाकताना पुश थ्रु पध्दतीचा वापर करावा . –  परेश ठाकूर, सभागृह नेते