पनवेलमध्ये ‘माय लाईफ, माय योगा’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली ’माय लाईफ, माय योगा’वर आधारित रेकॉर्डेड व्हिडीओ २०२० स्पर्धा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या

पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली ’माय लाईफ, माय योगा’वर आधारित रेकॉर्डेड व्हिडीओ २०२० स्पर्धा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी प्रभाग १९च्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पनवेल येथील  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आंतरराष्ट्रीय योग दिन रविवारी साजरा करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्या अंतर्गत २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य भेट आहे. योग हा भारतीय संस्कृतीचा अजरामर ठेवा आहे. धावत्या जगात मानवाला त्याच्या मुळाशी जोडून ठेवणारा दुवा म्हणजे योग आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक स्वास्थ्याचा मार्ग म्हणजे योग आहे.  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नेहा चाफेकर यांनी योग करण्याची विविध प्रात्यक्षिके दाखविली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी योगासने करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. ऑनलाईन प्रसारित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेकांनी सहभाग घेत आपापल्या घरीच राहून योगासने केली.