electricity

पनवेल : पनवेल(panvel) शहरात काही अज्ञात व्यक्ती महावितरणचे कर्मचारी असल्याचे सांगून ग्राहकाला बिल कमी करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत असल्याने महावितरणाच्या(mahavitran) पनवेलच्या कार्यकारी अभियंत्यांनी ग्राहकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
पनवेल शहरात काही अज्ञात व्यक्ती महावितरणचे कर्मचारी असल्याचा दावा करून बिल कमी करून देतो किंवा तुमचा लोड जास्त आहे तुमच्यावर कार्यवाही होईल, अशी खोटी बतावणी करून ग्राहकाकडून पैसे घेतात. अशा तक्रारी महावितरणच्या कार्यालयास प्राप्त झाल्या असल्याने कार्यकारी अभियंता /पनवेल शहर उपविभाग यांनी करोना काळात महावितरण कोणत्याही स्वरूपाची चेकिंग किंवा वीज तोडणीबाबतची कार्यवाही करीत नसल्याचा खुलासा केला आहे त्यांनी  सर्व ग्राहकांना कोणत्याही व्यक्तीवर त्याचे ओळखपत्र बघितल्याशिवाय विश्वास ठेवू नये. अशी व्यक्ती आपणास आढळल्यास महावितरणच्या कार्यालयास त्वरित कळवावे, असे आवाहन केले आहे.