panvel mayor visit

पनवेल : पनवेल महानगरपालिका(panvel corporation) हद्दीतील कोविड-१९ रुग्णालयांची पाहणी(mayor visit to kovid-19 hospitals) आज महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकुर यांनी केली.तसेच त्या ठिकाणी रुग्णांना मिळत असलेल्या विविध सोयी सुविधांची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आली.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. खाजगी दवाखान्यात रुग्णांकडुन मोठ्या प्रमाणात वेगवेगळे खर्च दाखवून लाखो रुपयांची बिले बनवून लुबाडणूक सुरू असताना महापालिकेने सुरू केलेल्या कोव्हिड सेंटरची परिस्थिति काय आहे याचा आढावा घेण्यासाठी महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकुर , स्थायी समिती सभापती,प्रविण पाटील पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व मुख्यलेखाधीकारी श्री मनोजकुमार शेट्ये यांचे उपस्थितीत देवांशी इन, टीआरा हॉल कळंबोली या कोविड सेंटरची व उपजिल्हा रुग्णालय, एम.जी एम हॉस्पीटल (कामोठे), या ठिकाणी असलेल्या कोविड-१९रुग्णालयांची पाहणी गुरुवारी केली.

यावेळी त्या ठिकाणी रुग्णांना मिळत असलेल्या विविध सोयी सुविधांची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आली, येथील रुग्णाशी संपर्क साधून त्यांच्या कडून त्यांना काही अडचणी आहेत का ? माहिती घेण्यात आली. त्या सोडवण्याबाबत प्रशासनाला आदेश देण्यात आले.