ऑनलाईन शिक्षण पद्धतीने पालक अडचणीत : पालकांना आर्थिक भुर्दंड

पेण - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाने ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे. परंतु हेच ऑनलाईन शिक्षण मात्र पालकांना महागात पडताना दिसत आहे. पेण तालुक्यातील शाळा कॉलेजांनी

 पेण – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाने ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे. परंतु हेच ऑनलाईन शिक्षण मात्र पालकांना महागात पडताना दिसत आहे. पेण तालुक्यातील शाळा कॉलेजांनी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला असून त्याप्रमाणे शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थी व पालकांनाही कळविले आहे. पेण तालुक्यातील मोबाईल दुकानांमधून बजेट मोबाइल गायब झाले आहेत त्यामुळे पालकांना इच्छा व आर्थिक शक्ती नसताना सुद्धा महागातले मोबाईल विकत घ्यावयास लागत आहेत.     

लॉकडाउन नंतर अनलॉक १ सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र मुंबईतील मोबाईलचे मार्केट पूर्णतः न उघडल्याने आजही अनेक मोबाईल विक्रेत्यांना मोबाईलचा माल उपलब्ध होत नाही. शैक्षणिक संस्थांनी ऑनलाइन शिक्षण घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी इंटरनेट सुविधा असलेले मोबाईल घेण्याचे कळविले यानंतर अनेक पालकांनी आपल्या मुलांकरिता मोबाईलच्या दुकानातून बजेट मोबाईल घेतले. परंतु विद्यार्थी हजारोंच्या संख्येत असल्याने तालुक्यातील दुकानदारा कडील बजेट मोबाइल ताबडतोब संपले. यानंतर मात्र महाग असलेले मोबाईलच उरल्याने पालकांना नाईलाजास्तव तेच घेणे भाग पडत आहेत.

सध्या पेण शहरातील दुकानदारांकडे १० हजार रुपयांच्या आतील मोबाईल संपले असल्याने पालकांना महाग मोबाईल विकत घ्यावे लागत आहेत.  काही पालकांचे २ ते ३ मुले मुली शिक्षण घेत आहेत. एकाच वेळी २ ते ३  मोबाईल घ्यावे लागत असल्याने एकाच वेळेला ३० ते ४० हजार रुपये एकरकमी खर्च होत आहेत. यामुळे कुटुंबाची आर्थिक बजेट पूर्णतः कोलमडून पडू लागले आहे.