सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याकडून विकासकामे आणि नालेसफाई कामांची पाहणी

पनवेल : पावसाळ्यापूर्वी पनवेल महापालिकेच्यावतीने सुरु असलेल्या विकासकामांची सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून कामासंदर्भात सूचना दिल्या.पनवेल महापालिका

पनवेल : पावसाळ्यापूर्वी पनवेल महापालिकेच्यावतीने सुरु असलेल्या विकासकामांची सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून कामासंदर्भात सूचना दिल्या. पनवेल महापालिका क्षेत्रात मागील वर्षी पावसाळ्यात अनेक वेळा पाणी तुंबल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे नुकसान झाले होते. यावर्षी पुन्हा तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी पावसाळयापूर्वी महापालिकेने आणि सिडकोने कोणती कामे केली पाहिजेत, याबद्दल प्रभाग अध्यक्ष आणि नगरसेवकांजवळ आठवड्यापूर्वी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी चर्चा केली होती. त्यांच्याकडून आलेल्या सूचनांप्रमाणे अधिकार्‍यांना काम करण्याबाबत सूचना केली होती. पनवेल महापालिकेतील प्रभाग क्रमांक १९ मधील गावदेवी पाडा, महाराष्ट्र बँक, एमटीएनएल रोड या परीसरात गटार सफाई, नालेसफाई, स्वच्छता तसेच गटारांच्या बांधणीचे काम सुरु आहे. या कामांची सभागृहनेते परेश ठाकूर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली .