महाड तालुक्यात लॉकडाऊनमध्ये १३,४९० चाकरमानी दाखल

महाड: देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आणि लॉकडाऊन रद्द करण्याचा विचार शासनाचा नसल्याने राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागांमध्ये व्यवसाय आणि नोकरीनिमित्त वास्तव्याला असलेले नागरिक

 महाड: देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आणि लॉकडाऊन रद्द करण्याचा विचार शासनाचा नसल्याने राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागांमध्ये व्यवसाय आणि नोकरीनिमित्त वास्तव्याला असलेले नागरिक आता आपल्या घराकडे येऊ लागले आहेत.महाड तालुक्यामध्ये ३० एप्रिलपर्यत १२,५२४ नागरिकांचे आगमन महाडमध्ये झाले तर त्यानंतर १३ तारखेपर्यत ९६६ नागरिकांचे आगमन झाले. असे एकुण तालुक्यांमध्ये १३ हजार ४९० नागरिकांचे आगमन झाले असल्याची नोद महाड पंचायत समितीच्या ग्रामविकास विभागाकडे करण्यात आली आहे.

महाड तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये गुजरात, राजस्थानसह मुंबई पुण्यांमध्ये कामधंदा,नोकरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबे मुंबई पुण्यामधून आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी हजारो कुटुंबे आपल्या गावाकडे परत येत आहेत. मात्र आपल्याच गावामध्ये येण्यासाठी ग्रामस्थांना अनेक दिव्यांना सामोरे जावे लागत आहे.महाड तालुक्यांमध्ये आता पर्यत आलेल्या नागरिकांची संख्या १३,४९० असुन या सर्व नागरिकांची नोद ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आली असल्याचे ग्राम विस्तार अधिकारी वाघमोडे यांनी सांगितले. येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. गावांमध्ये आलेल्या नागरिकांची प्रथम आरोग्य तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवले जाते. आलेल्या नागरिकांची व्यवस्था पाहण्यासाठी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेविका, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पंचायतीचे सदस्य लोक प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची राहाण्याची त्याच बरोबर जेवणाची व्यवस्था समितीने करायची आहे.या बाबत कोणतीही तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.