accident in raigad

अलिबाग - मांडवा रस्त्यावर आज दुपारी पीएनपी प्रवासी बस आणि कारचा(pnp bus and car accident on alibag mandva road धोकवडे येथील म्हात्रे फाटा येथे समोरासमोर अपघात झाला . या अपघातामध्ये कारमधील  दोघे जखमी झाले आहेत.

अलिबाग : अलिबाग – मांडवा रस्त्यावर आज दुपारी पीएनपी प्रवासी बस आणि कारचा(pnp bus and car accident on alibag mandva road) धोकवडे येथील म्हात्रे फाटा येथे समोरासमोर अपघात झाला . या अपघातामध्ये कारमधील  दोघे जखमी झाले आहेत. जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींमध्ये गोरख कडवे व जयेश ठोंबरे यांचा समावेश आहे.

पीएनपीची प्रवासी बस आज दुपारी मांडवा बंदर येथून अलिबागला  निघाली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास धोकवडे येथील म्हात्रे फाटा येथे आली असता समोरून इंडीका कार आली. दरम्यान दोन्ही वाहनांचा समोरासमोर  अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून कारमधील दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नांद केली आहे.

पीएनपीची प्रवासी बस शुक्रवारी दुपारी मांडवा बंदर येथून अलिबागला निघाली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास धोकवडे येथील म्हात्रे फाटा येथे आली असता समोरून इंडीका कार आली . दरम्यान दोन्ही वाहनांचा समोरासमोर  अपघात झाला . या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून कारमधील दोघेजण जखमी झाले आहेत.  याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद झाली आहे.