पोलादपूर तालुक्यातील पहिल्या कोरोनाबाधित महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू

पोलादपूर : भारतात कोरोनाने कहर केलेला असताना रायगड जिल्हयाचे शेवटचे टोक मानले जाणाऱ्या पोलादपूर शहरात ६३ वर्षीय महिलेचा कोरोनाचा रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आला आणि आज त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे

 पोलादपूर : भारतात कोरोनाने कहर केलेला असताना रायगड जिल्हयाचे शेवटचे टोक मानले जाणाऱ्या पोलादपूर शहरात ६३ वर्षीय महिलेचा कोरोनाचा रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आला आणि आज त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलादपूर शहरात ६३ वर्षीय महिलेला  कोरोना झाल्याचे शनिवारी निष्पन्न झाले.

 या महिलेला ८ एप्रिलला ताप व जुलाबाचा त्रास झाल्यानंतर तिला महाडमधील खाजगी दवाखान्यात गेली असता तिचा त्रास पाहता तिला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने व्हेंटिलेटर लावून तिला पुढील उपचारकरण्यासाठी  कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ती राहणाऱ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील २८ दिवस हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. या महिलेचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी या  महिलेला कस्तुरबा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. तसेच या महिलेला हाय डायबिटीस असल्याची माहितीदेखील प्राप्त झालेली आहे. या घटनेमुळे पोलादपुरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच प्रशासनाने कडक बंदोबस्त केला असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.