पोलादपूर भाजप तर्फे घंटानाद आंदोलन

पोलादपूर भाजप तर्फे महाविकास आघाडीचा निषेध करत पोलादपूर श्रीकाळभैरवनाथ मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

पोलादपूर : लॉकडाउनच्या (lockdown) काळात कोरोनाचा(corona virus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व गोष्टी बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सध्या अनलॉक (unlock) प्रक्रियेत हळूहळू सर्व सुरू करण्यात येत असल्याने महाराष्ट्रातील (maharashtra) मंदिरेच (temples) बंद का ? असा सवाल करत पोलादपूर (poladpur) भाजप (bjp) तर्फे महाविकास आघाडीचा (mahavikas aaghadi) निषेध करत पोलादपूर श्री काळ भैरवनाथ मंदिर येथे घंटानाद आंदोलन (ghantanad movement) करण्यात आले.

यावेळी भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत,पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे,माजी शहराध्यक्ष नितीन घोसाळकर, हरिश्चंद्र जाधव,गणेश गोळे,समीर सुतार,समाधान शेठ, तुकाराम केसरकर, शशांक घाडगे, राजाभाऊ दीक्षित, अमोल भागवत, युवा मोर्चाचे महेश निकम, राकेश सकपाळ, योगेश भोसले, सोपान शिंदे, महिला आघाडीच्या माई शेठ, रश्मी दीक्षित आदी उपस्थित होते.