पोलादपूर तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील परिसर कोरोनाबाधित क्षेत्र असल्याचे घोषित

पोलादपूर: पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक २, ५ आणि ६ कोरोना विषाणू बाधित क्षेत्र असल्याची घोषणा रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केली आहे.रायगड जिल्ह्यातील पोलादपूर

पोलादपूर: पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक २, ५ आणि ६ कोरोना विषाणू बाधित क्षेत्र असल्याची घोषणा रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केली आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर  तालुक्यातील पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.२- हनुमाननगर, ग्रामीण रुग्णालय परिसर, पोलादपूर, प्रभाग क्र.५- बौध्दवाडी, भैरवनाथनगर (पश्चिमेकडील भाग), प्रभाग क्र.६- प्रभातनगर, जाखमाता नगर, गोकूळनगर, सैनिकनगर व त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील २८ दिवस हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तसेच रायगडच्या  आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.  या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे.