पोलादपूर तालुक्यातील तुर्भे बुद्रुक येथील दोघांना कोरोनाची लागण, पोलादपूरात रुग्णांची संख्या ८ वर

पोलादपूर : पोलादपूर शहरात एप्रिल महिन्यात एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्यानंतर या महिलेच्या पतीलाही कोरोनाची बाधा झाली होती. मात्र या महिलेचा पती कोरोना मुक्त

 पोलादपूर : पोलादपूर शहरात एप्रिल महिन्यात एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्यानंतर या महिलेच्या पतीलाही कोरोनाची  बाधा झाली होती. मात्र  या महिलेचा पती कोरोना मुक्त झाला.  यानंतर तब्बल ३० दिवसानंतर २३ मे रोजी पुन्हा तालुक्यातील कापडे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत निवाचीवाडी येथे २ कोरोना पॉझिटिव्ह तर उमरठ फौजदार वाडी  येथे १ जण आणि रविवार पळचिल येथील १ असे चौघांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्या नंतर २४ तासात पुन्हा तुर्भे बुद्रुक येथील २ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची निष्पन्न झाले. तुर्भे येथील दोघांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याचे तालुका प्रशासनाकडून माहिती  प्राप्त झाली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलादपूर तालुक्यात १ मे पासून सुमारे ७  हजारपेक्षा जास्त चाकरमानी तालुक्याच्या ग्रामीण भागात दाखल झाले आहेत. या चाकरमान्यांना प्रशासनाच्यावतीने होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागात ट्रॅव्हलिंग हिस्ट्री असणाऱ्या चाकरमान्यांना कोरोनाची लागण होते असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाची धावपळ सुरू झाल्याचे  चित्र दिसून येत आहे. दरम्यान १५ मे नंतर पोलादपूर तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना विषाणूने शिरकाव केल्याने ४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असताना पुन्हा  तुर्भे बुद्रुक येथील २ जणांना गेल्या दोन  दिवसांपूर्वी  सर्दी, खोकला, ताप  आजारामुळे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा कोरोना चाचणी  अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची यादी बनविण्याची प्रक्रिया सुरू असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले परिसर  सील करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचे काम सुरू असल्याचे समजते.