पोलादपूरमधील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीलाही कोरोनाची लागण

पोलादपूर: दक्षिण रायगडचे शेवटचे टोक असलेला व दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेला पोलादपूरमध्ये एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने दक्षिण रायगड हादरले होते. तीन दिवसांनी तिच्या

 पोलादपूर: दक्षिण रायगडचे शेवटचे टोक असलेला व दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेला पोलादपूरमध्ये एका  महिलेचा  कोरोनामुळे  मृत्यू झाल्याने दक्षिण रायगड हादरले होते. तीन दिवसांनी तिच्या पतीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पोलादपूरमध्ये या विषाणूची गंभीरता वाढली आहे. ग्रामस्थ भयभीत झाले असून ज्या व्यक्ती या महिलेच्या संपर्कात आले त्या २६ जणांची तपासणी तातडीने करणे क्रमप्राप्त बनले आहे.

पोलादपूर शहरातील प्रभातनगर पश्चिम हा परिसरातील त्या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात तपासणी दरम्यान निष्पन्न झाले. त्यातच तिचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला. नंतर या बाबतची गंभीरता वाढीस लागली होती. या महिलेच्या पतीला पनवेल येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कोव्हिड-१९ विभागात ठेवण्यात आले होते. तर त्या महिलेच्या सुनेला रविवारी सायंकाळी पनवेल येथे तपासणी करता पाठविण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी पतीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या मृत महिला व पतीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा ट्रेस करत युद्ध पातळीवर तपासणी करणे गरजेचे आहे. 

 रायगड जिल्ह्यातील पोलादपूर शहरात कोरोनाची पहिली रुग्ण प्रभातनगर पश्चिम या लोकवस्तीमध्ये असलेल्या एका वृध्द जोडप्यापैकी महिलेला तीन दिवसांपूर्वी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये हलविण्यात आल्यानंतर कोरोनाटेस्ट पॉझिटिव्ह असल्याची  प्राप्त झाल्या नंतर पोलादपूर शहरातील प्रभातनगर पश्चिम हा परिसर तातडीने सील करण्यात आला आहे. या भागासह आसपासच्या भागात प्रत्येक कुटुंबाची तपासणी आरोग्य खात्यामार्फत सुरू असल्याचे  सांगण्यात आले. महिलेच्या पती बरोबर तिच्या मुलाचे व सुनेचा प्राथमिक रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे  तालुक्यातील या कोरोनाची वाढती गंभीरता लक्षात घेता प्रशासनाने कडक पावले उचलणे गरजेचे बनले आहे 
या घटने नंतर पोलादपूरमध्ये बंदच्या काळात जीवनावश्यक वस्तूची व बँकेत होणारी गर्दी कमी झाली आहे. हे दिलासा दायक असले तरी या महिला व पतीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणीसह बंदच्या काळात जे चाकरमानी गावात दाखल झाले आहेत, याची माहिती घेत त्याची तपासणी करणे क्रमप्राप्त बनले आहे.