पोलादपूरमध्ये वादळी पावसामुळे अनेकांचे नुुकसान

पोलादपूर: कोरोना पाठोपाठ अरबी समुद्रकिनारपट्टीवर घोंगावणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाचा धोका रायगड जिल्ह्याला मोठा असल्याने रायगडात येऊन निसर्ग चक्रीवादळ येऊन ठेपले असल्याने पोलादपुरात सकाळपासूनच

पोलादपूर: कोरोना पाठोपाठ अरबी समुद्रकिनारपट्टीवर घोंगावणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाचा धोका रायगड जिल्ह्याला मोठा असल्याने रायगडात येऊन निसर्ग चक्रीवादळ येऊन ठेपले असल्याने पोलादपुरात सकाळपासूनच वादळवाऱ्यासह पावसाची तुफान फटकेबाजी सुरू आहे  त्यामुळे नागरिक घरातच आपला ठिय्या मांडून बसलेले असल्याने मुंबई गोवा महामार्गसुद्धा सुनसान झाला आहे सकाळपासून सुरु झालेल्या पावसाने विश्रांती घेतली नाही. वादळी पावसामुळे पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी केबीनचे पत्रे उडाले असुन शिक्षण विभाग कर्मचारी बसत असलेल्या जागेवरीलही पत्रा उडाला आहे. तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा तुटवली केंद्र- कोतवाल बुद्रुक शाळेतील पत्रे उडाले. तसेच गावांमध्ये काही घरांचेही नुकसान झाल्याची माहीती प्राप्त झाली आहे. तसेच रमेश पालकर यांच्या घरावर मोठेझाड पडल्याने नुकसान झाले आहे . विक्रमराव मोरे हॉल, गंगामाता हॉलचेदेखील पत्रे उडाले आहेत. पोलादपूर शहरासह तालुक्यात वादळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे तर काहींच्या घराच्या परीसरात मोठी झाडे असल्याने धोका वाढू लागला आहे.