पोलादपूरमध्ये महावितरणचे नुकसान – ३६ तासानंतर विद्युत पुरवठा सुरळीत

पोलादपूर: निसर्गचक्रीवादळाचा फटका घरासह शासकीय कार्यालयाच्या इमारतींना बसला. तसेच हा फटका महावितरण च् पोल ,तारा यांना बसला असुन बुधवारी दुपारपासून गेलेली झालेली लाईट ३६ तासानंतर सुरू झाल्याने

पोलादपूर: निसर्ग चक्रीवादळाचा फटका घरासह शासकीय कार्यालयाच्या इमारतींना बसला. तसेच हा फटका महावितरण च् पोल ,तारा यांना बसला असुन बुधवारी दुपारपासून गेलेली झालेली लाईट ३६ तासानंतर सुरू झाल्याने ग्रामस्थांची अंधारापासून सुटका झाली आहे. पोलादपूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे पडल्याने तसेच झाडाच्या फांद्या वीज वाहून नेणाऱ्या तारा ठिकठिकाणी निखळल्याने सर्वत्र अंधार झाला होता. पोलादपूर  तालुक्यात जवळपास महावितरणचे हाय टेन्शन लाईन व लो टेन्शन लाईन मेन लाईन सह सुमारे ४० विद्युत पोल वाकले तर काही जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे महावितरणकडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू करण्यात आली होती. त्यात अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागला. तसेच साहित्य कमी असल्याने ते मागविण्यात आले. मात्र त्यात वेळ जात असल्याने तालुकावासीयांना अंधाराचा सामना करावा लागला होता. याबाबत अधिक माहिती घेतली असता वीज वितरणचे सर्व कर्मचारी लाईनवर काम करत असल्याचे सांगून अनेक अडचणींवर मात करत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, अशी माहिती उप अभियंता सुद यांनी दिली आहे.