पोलादपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पुन्हा मुसळधार पावसाच्या सरी

पोलादपूर:तालुक्यात आज पुन्हा वादळी वाऱ्या सह पावसाने सायंकाळी हजेरी लावल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत तालुक्यातील शहरी भागात रात्री २ नंतर झालेल्या पावसानंतर रविवारी संध्याकाळी ५ वाजता

 पोलादपूर: तालुक्यात आज पुन्हा वादळी वाऱ्या सह पावसाने सायंकाळी हजेरी लावल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत तालुक्यातील शहरी भागात रात्री २ नंतर झालेल्या पावसानंतर रविवारी संध्याकाळी ५ वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार पर्जन्यवृष्टी केली आहे. रात्रीसारखी बत्तीगुल झाली असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. अवकाळी पावसाने आपले रूप दाखवत पोलादपूर तालुक्यात १२ तासाच्या काळात पुन्हा आपले रूप दाखवत ग्रामस्थांना आगामी पावसाची सूचना दिली आहे. आज सायंकाळी झालेल्या पावसात पोलादपूर प्रभात नगर येथील नेहा अपार्टमेंट व प्रेस्टिज अपार्टमेंटवरील पत्रा वादळी पावसात उडाले आहेत तर काही ठिकाणी घराबाहेर ठेवलेले साहित्य उडाले असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. ग्रामीण भागात ही पावसाने जोरदार वृष्टी केली असून महिला वर्गाने बेगमीसाठी केलेले पापड फेण्या यासह इतर साहित्य उन्हात वाळत घातले होते. पावसाची वर्दी मिळताच ते गोळा करण्याची धांदल उडाली असल्याचे पहावयास मिळाले. या चक्री वादळी पावसात पोलादपूरमध्ये काही इमारतीचे पत्रे उडाले असून हजारो रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.आधीच कोरोना च्या प्रादुर्भाव ने त्रस्त असलेल्या नागरिकांना वादळी पावसाचा तडाखा सहन करावा लागत आहे